टाळ मृदुंगाच्या गजरात महिलांची दिंडी
यवतमाळ (प्रतिनिधी) : रेणुका माता महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पलता शरदराव सप्रे व मंडळाच्यावतीने टाळ, मृदुंगाच्या गजरात व भगव्या पताका हाती घेत विठु नामाचा गजर करीत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी वारकरी वेश परिधान केला होता.मुख्य रस्त्यावर रिंगण सोहळा देखील संपन्न झाला.या दिंडी सोहळ्याने अवघा परिसर विठू नामाच्या भक्तिरसात न्हावून निघाला. विठ्ठल रुखमाईच्या जयघोषात आषाढी एकादशी पार्श्वभूमीवर यवतमाळ शहर काढलेल्या दिंडीने दुमदुमले होते. ही दिंडी प्रवीण नगरी वडगाव ते विठ्ठल मंदिर वडगाव तसेच तेथून मेनलाईन गांधी चौक येथील विठ्ठल मंदिर पर्यंत दिंडी निघाली.या दिंडी मध्ये कुसुमताई ठावरी, रंजना चौधरी,आरती चौधरी, सविताताई सरगर ,महल्ले काकू, छायाताई बनकर,किरणं महाजन, जीजा महल्ले,राजाभाऊ वाघाडे, नारायण पेटकर, संध्याताई वानखडे, अर्चना कठाळे,रेखाताई जिवतोडे, रेखाताई दरणे, चित्राताई मुंदेंकर यांच्यासह अनेक महिला भिगिनी उपस्थित होत्या.