नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ मदत करा – आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन शेतक-यांना तात्काळ मदत करा - आ. संभाजीराव पाटील निलंगेकर

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हयात खरीप हंगामासाठी सोयाबीनचा पेरा ८० टक्केपेक्षा अधिक आहे. जिल्हयात जवळपास सर्वच भागामध्ये खरीपाची पेरणी झालेली आहे. मात्र जुलै महिन्याच्या दुस-या आठवडयापासून जिल्हयात सर्वत्र सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश पाऊस पडलेला आहे. या पावसाने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश ठिकाणी सोयाबीनचे पिक नष्ट झालेले आहे. तसेच सतत पडणा-या पावसाने जिल्हयातील बहुतांश शेतांमध्ये पाणी साचून शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. या तिहेरी संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. या परिस्थितीमुळे शेतक-यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावलेले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी प्रशासनाला सूचना देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना तात्काळ मदत देवून दिलासा देणे गरजेचे आहे. अशी मागणी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

About The Author