मराठवाड्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने चालु वर्षातील हंगामात यशस्वीपणे गाळप करत उच्चांक गाठला

मराठवाड्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने चालु वर्षातील हंगामात यशस्वीपणे गाळप करत उच्चांक गाठला

मराठवाड्यातील साखर कारखानदारीला दिशा देणारा साखर कारखाना

लातूर (हरिराम कुलकर्णी) : मराठवाडा म्हटले की मागास भाग असे म्हटले जाते हे वाक्य पूर्वी ३० वर्षापूर्वी   म्हणायचे त्यात लातूर म्हटले की नद्या,पाणी, शेती उत्तम, उद्गोग नाही नगदी पीक मिळायचे सोर्स नाही माञ राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते संस्थापक विलासराव देशमुख यांनी ३५ वर्षापूर्वी उजाळ माळरानावर मांजरा साखर कारखाना उभा केला या अद्वितीय विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखाना दीपस्तंभ सारखा उभा आहे या साखर कारखान्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत साखर कारखाने ऊभे राहिले त्याला दिशा देण्याचे काम लातूरच्या विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने केले असून चालु वर्षाच्या २०२१- २२ च्या हंगामात साखर कारखान्याने मागचे सर्व  गाळपाचे उत्पादन कामगिरीचे रेकॉर्ड तोडून नविन उच्चांक प्रस्थापित केला आहे यावर्षी चालू हंगामात साखर कारखान्याने ८ लाख ६० हजार मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप करून ८ लाख ९० हजार क्विंटल साखर उत्पादन केले असून कारखान्याने एफआरपी प्रमाणे २६५६ रुपये मेट्रिक टन प्रमाणे तब्बल २२८ कोटी ५६ लाख रुपये उस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेले आहेत तसेच कारखान्याचे को -जन विभागाकडून ४ कोटी ९० लाख ७८ हजार ५० युनिट वीज महावितरण कंपनीकडे निर्यात केली आहे तर अर्क शाळा विभागाने १ कोटी १ लाख ३४ हजार १४८ लिटर अल्कोहोल व ८३ लाख ३९ हजार १८८ लिटर इथेनॉल चे उत्पादन घेवून आतापर्यंत कारखान्याने केलेल्या सर्व गाळप हंगामाचा विक्रम मोडीत काढून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे   साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमीत विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा साखर कारखान्याची घौडदौड सुरू आहे मराठवाड्यातील सहकारी  साखर कारखानदारीला दिशा देण्याचे काम याच विकास रत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने दिले आहे.

मराठवाड्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने चालु वर्षातील हंगामात यशस्वीपणे गाळप करत उच्चांक गाठला

अवर्षन परीस्थिती अतिरीक्त उस मात्र अचूक कामगिरी

यावर्षी चालू हंगामात उसाची अतिरीक्त लागवड, पावसाचे थैमान , आदि संकट समोर असताना कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब  यांनी गाळप हंगामात सर्व उसाचे गाळप व्हायला पाहिजे यांची व्युहरचना केली   अतिशय काटेकोर पालन करण्यासाठी कारखाना प्रशासन, उस तोडणी, कामगार,, कृषि विभाग, अधिकारी कर्मचारी यांना सूचना दिल्या तात्काळ सूचनांचे पालन करत कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांचे उसाचे गाळप करून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे उसाचे टीपरू शिल्लक राहणार नाही जो शब्द जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांनी चाकुर येथील कार्यक्रमात दिला होता तो  साखर कारखान्याने पाळला आहे.

मराठवाड्यात उसतोडणी यंत्राची सुरवात केली

दरवर्षी उस तोड कामगाराची कमतरता लक्षात घेऊन माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी पहिल्यांदा गेल्या वर्षी मराठवाडयात विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याने उस तोडणी यंत्राची सुरवात केली कारखान्याने १३ उस तोडणी यंत्र वाटप केले होते मात्र ते ही कमी पडत असल्याने उस गाळप लवकर व्हावे यासाठी साहेब यांनी बाहेरून उस तोडणी यंत्र मागवून चालु वर्षात कार्यक्षेत्रातील उसाचे विक्रमी गाळप करून  मांजरा साखर कारखान्याने नवीन उच्चांक प्रस्थापित केला आहे.

दिलीपराव देशमुख साहेबांचे दूरदर्शी निर्णय एक पाऊल पुढे

यावर्षी चालू हंगामात उसाचे अतिरीक्त लागवड झाल्याने व अतिरीक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता  पुढील हंगामात अडचण होउ नये यासाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी ३० उस तोडणी यंत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तसेच गाळप क्षमतेत वाढ करून ४७५० टीसीडी  वरून ७५०० टीसी डी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांची कार्यवाही अत्यंत नियोजन पद्धतीनें सुरू आहे कारखान्याचा यशस्वी वाटचालीत राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमीत देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे कार्यकारी संचालक जितेंद्र रनवरे, सन्माननीय संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे.

विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्यामुळे मराठवाड्यातील साखर कारखानदारीला दिशा मिळाली

मराठवाड्यात लातूर येथे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी ३५ वर्षांपूर्वी मांजरा साखर कारखाना  तो दीपस्तंभ सारखा उभा आहे त्यांच्या प्रेरणेने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमीत देशमुख आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मांजरा परिवारात रेणा, विलास, जागृती, मारूती, विलास २, ट्वेण्टी वन शुगर साखर कारखाने ऊभे राहिले नुसते ऊभे राहिले नाहीत त्यातून जिल्ह्यात सहकार चळवळ टिकवून ठेवली दरवर्षी या साखर कारखान्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांना १५०० ते १८०० कोटी रुपये मिळत आहे तो पैसा बाजारात फिरत आहेत विकासाला चालना देण्यासाठी या मांजरा साखर परिवाराचा मोठा सहभाग राहिलेला आहे.

About The Author