माजी मंत्री अमित देशमुख यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबा मंदिर येथे केली आरती
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवारी दि. १३ जुलै रोजी सकाळी गुरुपौर्णिमेनिमित्त लातूर शहरातील विशाल नगर भागातील श्री साईबाबा मंदिर येथे जाऊन श्री साईबाबाचे दर्शन घेऊन आरती केली आशिर्वाद घेतले त्यांचा यावेळी श्री साई मंदिर संस्थानच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, मांजरा आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद पवार, जिल्हा काँग्रेसचे माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, सूर्यकांत कातळे, दत्ता सोमवंशी, नाना पाटील, नागसेन कामेगावकर, राजकुमार पाटील, एकनाथ पाटील, प्रा. प्रवीण कांबळे, माजी नगरसेवक विकास वाघमारे, पुनीत पाटील, गोटू यादव, पंडित कदम, आयुब मणियार, सुंदर पाटील कव्हेकर, अब्दुल्ला शेख, देविदास बोरूळे पाटील, संजय धारूरकर महाराज, गणेश जोशी महाराज, आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
आमदार अमित देशमुख यांनी केली भर पावसात मंदिर परिसरातील पाहणी
बुधवारी सकाळी ११ वाजता माजी मंत्री आमदार अमीत देशमुख यांनी साई मंदिर येथे गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनाला आले असता त्यांनी भर पावसात मंदीर परिसरात असलेल्या सोयी सुविधा वृक्षाची पाहणी केली समाधान व्यक्त केले काही सूचना केल्या.
