तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी – आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर-चाकुर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याविषयी सविस्तर माहीती अशी की, गेल्या काही दिवसापासुन सतत पडणाऱ्या पावसामुळे तसेच पिकावर पडलेल्या गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे यामुळे आमदार बाबासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज दि १४ जुलै रोजी पत्र लिहले असुन त्यात अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये सतत गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे व गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे सोयाबिन सह इतर पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सर्व पिके मागील आठ दिवसापासून पाण्यातच आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. कोवळया मोडांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही भागांत तर अक्षरक्षः अख्खे शेत गोगलगायींनी फस्त केले आहे . तरी जिल्हा कृषी अधिकारी, तहसिलदार व विमा कंपनी यांना त्वरीत सुचना देवून सोयाबीन पिकाचे पंचनामे करुन शेतक – यांना तात्काळ मदत मिळणे बाबत कार्यवाही करावी अशी अग्रही मागणी मुख्यमत्री यांच्याकडे केली आहे.
