महात्मा फुले महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

महात्मा फुले महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते तर मराठी विभागाचे डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच, डॉ. मारोती कसाब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावर यथोचित प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार समाजशास्त्रीय विभागप्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!