रेणूकादेवी भक्त निवास, बौध्द विहार सभागृहासह विविध विकास कामासाठी रेणापूरला पाच कोटीचा निधी मंजूर
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होताच रेणापूर शहरातील रेणूकादेवी भक्तनिवास, बौध्द विहार सभागृह यासह विविध विकास कामासाठी पाच कोटी रूपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचा रेणापूर भाजपाच्या वतीने सत्कार करून आभार मानले. शिंदे-फडणवीस सरकार कामगीरी दमदार अशी प्रतिक्रिया रेणापूरकरांतून व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायऊतार होवून राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार नुकतेच सत्तेवर आले. सरकार स्थापन होताच भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेवून नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. आ. कराड यांनी केलेल्या मागणीनुसार राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने रेणापूर येथे एक कोटी रूपये खर्चाचे रेणूकादेवी भक्त निवास आणि सम्राट बौध्द विहार सभागृह बांधकाम यासह विविध विकास कामाकरीता पाच कोटी रूपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती रेणापूर नगर पंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगीरे यांनी दिली.
रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी नव्या सरकारने मंजूर केलेल्या पाच कोटी रूपये निधी अंतर्गत श्री. रेणूकादेवी मंदिर येथे भक्त निवास बांधकाम करणे १ कोटी, प्रभाग ४ मध्ये सम्राट बौध्द विहार सभागृह बांधकाम १ कोटी, प्रभाग १६ मध्ये मेन रोड ते मश्जीद पर्यंत सिमेंट रोड आणि नाली बांधकाम ३४ लक्ष, प्रभाग १२ मध्ये कुरे गल्ली ते तकीया मश्जीद पर्यंत सिमेंट रोड आणि नाली बांधकाम १६ लक्ष, प्रभाग १० मध्ये नरसिंह मंदिर ते सराये मश्जीद पर्यंत सिमेंट रोड आणि नाली बांधकाम २० लक्ष, प्रभाग ३ मध्ये विक्रम खंदाडे यांचे घर ते स्मशानभुमी पर्यंत पर्यंत सिमेंट रोड आणि नाली बांधकाम ५० लक्ष, प्रभाग १४ मध्ये संतराम चव्हाण ते दिलीप राठोड यांच्या घरापर्यंत सिमेंट रोड आणि नाली बांधकाम १५ लक्ष, प्रभाग ३ मध्ये गुरू रोहीदास महाराज मंदिरासमोर सभागृह बांधकाम करणे १५ लक्ष, प्रभाग ११ मध्ये भांबरे यांचे घर ते बसवेश्वर चौकापर्यंत सिमेंट रोड आणि नाली बांधकाम ५० लक्ष आणि रेणूकादेवी मंदिराला जोडणारे सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम ५० लक्ष याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.
राज्यात नवे सरकार सत्तेवर येताच अनेक लोकाभिमूख निर्णय घेतले जात असून शिंदे-फडणवीस सरकार कामगीरी दमदार अशी प्रतिक्रिया सर्व स्थरातील जनतेतून व्यक्त होत आहे. रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी आ. रमेशअप्पा कराड यांनी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोमवारी रेणापूर येथील भाजपाच्या आणि नागरीकांच्या वतीने आ. कराड यांचा सत्कार करून ऋण व्यक्त केले त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, शेख अजिम, महेश गाडे, श्रीकृष्ण मोटेगावकर, विजय चव्हाण, दत्ता सरवदे, धनंजय म्हेत्रे, राजू अत्तार, उत्तम घोडके, नंदकुमार मोटेगावकर, अंतराम चव्हाण, रफीक शिकलकर, योगेश राठोड, रमेश वरवटे, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
