धनेगाव नदीकाठी ३००० वृक्षांची लागवड
जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनीही केली शेतकऱ्यांसह वृक्ष लागवड
जिल्हाधिकारी कार्यालय, आधार फाउंडेशन, सामाजिक वनीकरण विभाग, व ग्रामपंचायत कार्यालय, धनेगाव यांचा संयुक्त उपक्रम
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा नदी काठच्या दुतर्फा वृक्ष लागवड करणेसाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.सर यांच्या संकल्पनेतून आधार फाऊंडेशन,धनेगाव ता.जि.लातूर, सामाजिक वनीकरण विभाग, लातूर व ग्रामपंचायत कार्यालय, धनेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ३००० वृक्षलागवड संपन्न झाली. यामध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनव गोयल यांनीही ग्रामस्थ, विद्यार्थी यांच्यासह वृक्ष लागवड केली.
मांजरा नदीच्या काठावर वृक्षांची संख्या कमी झाल्या कारणाने होत असलेले जमीनीची स्खलन व त्यामुळे होणारे मातीचे वहन रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात नदीकाठावर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे करण्यात आले. दुस-या टप्प्यात धनेगाव येथे नदी काठावरील शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यामध्ये वृक्ष लागवड अभियानाचा व संवर्धनाचा उद्देश शेतकऱ्यांना सांगण्यात आला तिसऱ्या टप्प्यात सर्व ग्रामस्थांची या अभियानाच्या अनुषंगाने जनजागृती करण्याकरिता वृक्षदिंडी काढण्यात आली यामध्ये गौरीशंकर विद्यालय धनेगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या वृक्षदिंडीचा शुभारंभ धनेगाव चे माजी सरपंच श्री गौरीशंकर विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंतराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला चौथ्या टप्प्यात “वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज” या विषयावर वृक्षमित्र डॉ. डी आर पाटील यांनी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्याशी सुसंवाद साधून अभियाना विषयी जनजागृती केली पाचव्या टप्प्यात गावातील शेतकऱ्यांच्या व स्वयंसेवकांच्या माध्यमातून वृक्ष लागवडी करता तीन हजार खड्डे मांजरा नदीच्या दुतर्फा खोदण्यात आले शेतकऱ्यांना उंबर, जांभुळ, चिंच अर्जुन, बांबू आदींची रोपं देण्यात येऊन सदरील खड्ड्याजवळ ठेवण्यात आली व सातव्या टप्प्यात दिनांक २४ जुलै २०२२ रोजी सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी या तीन हजार ठिकाणी सामाजिक वनीकरण विभाग, लातूर,आधार फाउंडेशन धनेगाव,ता जि लातूर,जयक्रांती महाविद्यालय,लातूर,कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय,बाभळगाव, कै. वसंतराव काळे होमिओपॅथिक महाविद्यालय लातूर, गौरीशंकर विद्यालय, धनेगाव येथील विद्यार्थी, स्वयंसेवक व शेतकऱ्यांच्या माध्यमातून ३००० वृक्ष लागवड करण्यात आली यानंतर आलेल्या सर्व विद्यार्थी, कर्मचारी व अधिकारी यांचे आभार आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण हणमंतराव पाटील यांनी गुलाब पुष्प देऊन व्यक्त केले.
सदरील अभियान यशस्वी करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनव गोयल, फिनीक्स फाउंडेशन चे अध्यक्ष पाशा पटेल, उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना नितीन वाघमारे, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण लातूर सुनिल शिंदे, तहसीलदार लातूर श्री स्वप्नील पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण दत्तात्रय गिरी, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, गटशिक्षणाधिकारी लातूर संजय पंचगल्ले, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील, प्राचार्य गुंजरगे सर, प्रा.भिसे सर, मांजरा साखर चे माजी संचालक श्रीहरी चामले, माजी सरपंच प्रताप पाटील, माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संतोष बेंबडे, चेअरमन वर्षीकेत मस्के, सरपंच सौ.गोकर्णा श्याम करे, उपसरपंच अॅड.रूपेश थोरमोठे, श्याम करे , रत्नदीप पाटील, सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शरयु रूद्रावार, वनपरीमंडळ अधिकारी लातूर विवेक नारंगवाडे, वनपरीमंडळ अधिकारी एस.जी.तोरकडे, वनरक्षक श्री.कसबे, वनरक्षक गिरी मॅडम, ग्रामसेवक राणी पवार, तलाठी बालिका सुडे -बडगीरे , कृषी सहायक स्नेहा कंदीले, प्रा.जयदेवी पवार, प्रा.भांजी, प्रा.कटारे, जयक्रांती महाविद्यालय चे प्रा.अनगुले सर, गौरीशंकर विद्यालय धनेगाव चे मुख्याध्यापक व्हि आर जाधव, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कराड, इब्राहिम शेख, नागनाथ मेकले, अझर शेख, मंगेश माने, भागवत मस्के, नरसिंग चामले, गणेश चामले, व्यंकटेश पाटील,अॅड. खंडेराव चामले, शिवदत्त मेकले, अश्विन जांभळे, योगेश कांबळे, राहुल कांबळे, राम करे, अभिमन्यू कांबळे, ऊमाकांत पाटील, ओमकार गायकवाड, दोन्ही शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी व शेतकरी आदींनी प्रयत्न केले.