अखेर पुन्हा एकदा कोराळी गावाचा संपर्क तुटला

अखेर पुन्हा एकदा कोराळी गावाचा संपर्क तुटला
अखेर पुन्हा एकदा कोराळी गावाचा संपर्क तुटला

कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : कोराळी (ता. निलंगा) या गावला जाणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून अतिशय खराब होऊन कोरळी वाडी येथील पुल पुटून पाण्याने वाहत गेल्याने शहरापासून कोराळी व कोरळी वाडीचा संपर्क तुटलेला आहे.

कोराळी हे गाव कासार सिरसी शहरा पासून सात किलोमीटर अंतरावर असून या दोन गावांना जोडणारा मुख्य रस्ता व तसेच कर्नाटक राज्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठी वरदळ आहे तसेच हावे नंबर नऊ वरती टोल नका असल्याने या रस्तावर मोठी वरदळ आहे यात आवजड वाहने टोल चुकविण्यासाठी म्हूणन या रस्तेचा मार्ग निवड करत आहेत.

हा रस्ता मागील काही वर्षा पासून पूर्णतः खराब झाले आहे रस्त्यावर खडेच खडे पडून चिकलमय होऊन प्रवासाना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
यामुळे या रस्त्याची येथील गावाकऱ्यांच्या वतीने अनेकदा वारंवार मागणी करून पाठ पुरावा करूनही हा रस्ता होत नसल्याने येथील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
आता दोन –ते तीन दिवस सतत पाऊस होत असल्याने ओढा येऊन कोरळी वाडी येथील पुल पाण्याने वाहून गेले आहे
हा पुल गेल्या वर्षी अति मुसळधार पाऊस झाला होता त्या पाऊसात सोयाबीनचे गणजीच गंजी पाण्याने वाहत गेलेले होते त्यामध्ये हा पुल सुद्धा पाण्यात वाहत गेला होता एक वर्षा होऊन गेले हा पुल जसाच तसा आहे फक्त त्यामध्ये पाऊस कमी झाले तेव्हा खड्यात माती टाकून
ये–जा करण्या योग्य केले होते पण सतत दोन ते तीन दिवस पाऊस पडत असल्याने ओढयाला पाणी येऊन पुन्हा ते टाकलेली माती व पुल वाहून गेला आहे.
यामुळे या रस्त्याने चार चाकी वाहनाला जात येत नसल्याने दळण वळण ठप झालेला आहे या दोन्ही गावातुन शाळा – कॉलेजला जाणाऱ्या विध्यार्थी घरी बसून आहेत.
अडत मार्केटला माल, विध्यार्थाना, अन्य कामासाठी बाहेर जाणाऱ्या नागरिकांची कोंडी झालेले आहे
फक्त दोन चाकी मोटार सायकल व पायी जावे लागत आहे

पुन्हा एकदा सरकार,प्रशासन, व लोकप्रतिनिधीनी याकडे त्वरित लक्ष देऊन विद्यार्थीचे शालेय लुकसान होऊ नये, नागरिकांची पडझड थांबावावी, सुख रूप प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्न करावे, व तसेच लवकरात लवकर रस्ता करून जीवन घेणा प्रवास सुखरूप करावे,अशी साकडे येथील नागरिक घालत आहेत.

About The Author