सोयाबीन टोबण पद्दत ठरत आहे परिणामकारक

सोयाबीन टोबण पद्दत ठरत आहे परिणामकारक

लातूर जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन टोबण पद्दतीने

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र विक्रमी वाढले असून या वर्षी 4 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे. हे प्रमाण गेल्या वर्षी 4 लाख 59 हजार हेक्टर एवढे होते. कृषी विभागाने सोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेऊन अधिक उतारा यावा म्हणून वाफ्यावर टोबण करण्याचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे यातील 20 हजार हेक्टरवर टोबण पद्दतीने किंवा बी बी एफ पद्दतीने लागवड झाली आहे. त्याचा गेल्यावर्षी उत्तम परिणाम दिसून आल्यामुळे यावर्षी याकडे लोकांचा ओढा वाढला असल्याची माहिती जिल्ह्याचे कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. शिवार फेरीवर असताना ते बोलत होते.

लातूर जिल्हा देशातील सोयाबीन उत्पादनाचे हब असल्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव लातूरचा कृषी बाजार ठरवतो. लातूरला सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग असल्यामुळे सोयाबीनला सर्वाधिक उठाव लातूर मध्ये आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र पाच लाख 71 हजार हेक्टर आहे. त्यातले तब्बल 4 लाख 77 हजार क्षेत्र फक्त सोयाबीनचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने अधिकाधिक उतरा देणाऱ्या पद्दती विकसित केली आहे.

बी बी एफ ( ब्रॉड बेस फुरो ) आणि टोबण किंवा टोकन पद्दत म्हणजे काय

आपण ऊस लावताना सऱ्या करून लावतो. तेवढ्या मोठ्या नाहीत पण कमी आकाराच्या सऱ्या करून सऱ्यावर सोयाबीन हाताने किंवा मशीनच्या सह्याने टोबून लागवड करायची असते. अधिक पाऊस पडला तरी तो वाफ्यात साचतो सोयाबीन सरीवर असल्यामुळे त्याच्यामुळापर्यंत पाणी जात नाही. त्यामुळे मुळ्या कुजून सोयाबीन हातातून जाण्याचा धोका संपतो.तसेच वाफ्यावर आणि दोन झाडात अंतर असल्यामुळे खेळती हवा असते त्यामुळे रानाला वापसा लवकर येते त्यामुळे वाढीला मोठे अवसान मिळते, बियाणे कमी लागते आणि उतारा वाढतो अशी माहिती गावसाने यांनी यावेळी दिली. शिरूर ताजबंद येथे मनोहर खेडकर यांनी अशा पद्दतीने सोयाबीनची लागवड केली आहे. त्या पिकाची पाहणी कृषी विभागाच्या टीमने पाहणी केली.

20 हजार हेक्टरवर ह्या पद्दतीने लागवड झाली याचा उतारा दुप्पट होईल त्यानंतर मात्र पुढल्या हंगामात अशा पद्दतीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळतील अशा अपेक्षा जिल्हा कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी व्यक्त केली.

About The Author