कासार सिरसीत शांतता बैठक संपन्न; अध्यक्ष विरेश चिंचनसुरे तर उपाध्यक्ष बाबूमिया लामजाने

कासार सिरसीत शांतता बैठक संपन्न; अध्यक्ष विरेश चिंचनसुरे तर उपाध्यक्ष बाबूमिया लामजाने

कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी (ता. निलंगा ) येथे दरवर्षी मोठे मोठे सण येत असतात उदा. दसरा, गणपती, बकरी ईद, मोहरम असे सण आल्यास येथील पोलीस स्टेशनच्या व गावाकऱ्यांच्या वतीने शांतता कमेटी स्थापन करून अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करून जबाबदारी दिली जाते.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोहरम उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोहरम शांतता कमेटी अध्यक्ष म्हणून विरेश चिंचनसुरे व उपाध्यक्ष बाबुमिया लामजने यांची सर्वांमते निवड करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रतिनिधी मोनेश्वर पांचाळ, पोलीस निरीक्षक नवनाथ ढमाळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीसागरसाहेब, उपसरपंच बडेसाहेब लकडहारे, ग्रामपंचायत सदस्य विवेक कोकणे,गोरख होळकुंदे, पुर्थ्वीराज सरवदे, भारतीय जनता पार्टी मंडळ संघटक धनराज होळकुंदे, अल्पसंख्यांक मंडळ अध्यक्ष जिलानी बागवान,नारायण डोबाळे हाजुलाल नासरजगं पत्रकार ज्ञानेश्वर मडोळे संतोष डांगे सर्वपक्षीय कार्यकर्ते परिसरातील सर्व पोलीस पाटील व नागरिक मोठया संख्याने उपस्थित होते.

About The Author