कासार सिरसीसह परिसरात अतिवृष्टी शेतकऱ्याचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी

कासार सिरसीसह परिसरात अतिवृष्टी शेतकऱ्याचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याची नागरिकांची मागणी

कासार सिरसी ( बालाजी मिलगिरे ) : कासार शिरसी सह या परिसरात कासार बालकुंदा मदनसुरी व सरवडी या महसुली विभागातील 68 गावातील शेतकऱ्यांना याही वर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागत असून या मंडळात अति पावसामुळे खरिपाचे नगदी पिक याही वर्षी हातचे गेल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले असून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे
महाराष्ट्र कर्नाटकाच्या सीमा भागातला कासार शिरशी चा परिसर हा प्रामुख्याने डोंगराळ असून लाल मातीचा आहे जमिनी हलक्या प्रतीची असल्याने बहुतांश शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून शेती करावी लागते त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे खरीप पिक हे उत्पन्नाचे मोठे साधन आहे तेही अतिवृष्टीने हातचे गेले तर संपूर्ण वर्ष वाया जाते असा दरवर्षीचा अनुभव आहे
याही वर्षी कासार शिरसीत सोळाशे दोन हेक्टर एकूण क्षेत्रापैकी पोट खराबा
जाता 1225 हेक्टरावर सोयाबी न व तूर पिकाची लागवड करण्यात आली होती पण यावर्षी सुद्धा अतिवृष्टीने सोयाबीनचे उभे पीक सध्या पाण्यात असून काही ठिकाणी किडींच्या प्रादुर्भावणे संपूर्ण खरीप पिक उध्वस्त झाले असून बळीराजा चिंतेत आहे या सततच्या पावसाने येथील बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले असून सरसकट पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे

About The Author