उदगीर ग्रामीणच्या डीबी पथकाची कामगिरी लय भारी !!

0
उदगीर ग्रामीणच्या डीबी पथकाची कामगिरी लय भारी !!

चोरीतील दोन लाख 70 हजाराचा मुद्देमाल चोरासह पकडली चोरी !!

उदगीर (एल पी उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच, अर्थात एक मार्च रोजी गोरख जग्गा चव्हाण या कौलखेड येथील शेतकऱ्याने फिर्याद दिली की, दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी मी गुरधाळ तळ्यातील पाण्यात टाकलेली पाणबुडी मोटरचे वायर 100 फूट लांबीचे किंमत अंदाजे 12 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. वगैरे तक्रारीवरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुरन 101/26 कलम 303 (2 )भारतीय न्यास संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमाल व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरिता लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उदगीर उपविभागाचे पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हवालदार राम बनसोडे, संदीप केंद्रे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवर, सचिन नाडागुडे यांना बोलावून घेऊन सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी व मुद्देमालाचा शोध घेणे बाबत आदेश दिले होते.
वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाल्यामुळे या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये गोपनीय बातमीदार नेमले होते. योगायोगाने एका गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहिती दिली की, हेर येथे दोन मुले पुणे येथून आले आहेत. ते पवन कळसे रा. हेर यांच्या घरी आहेत. अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी पवन विश्वनाथ कळसे (वय 20 वर्ष राहणार हेर तालुका उदगीर), धीरज विश्वनाथ कसबे (वय 22 वर्ष राहणार करडखेल तालुका उदगीर जिल्हा लातूर) व दोन विधी संघर्ष बालक हे तेथे मिळून आले. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या एकूण हालचालीच्या संदर्भातील माहिती त्यांना सांगून चौकशी केली असता, मनातून घाबरलेल्या त्या संशयित आरोपीने आपण अनेक चोऱ्या केल्याचे कबूल केले.
ज्यामध्ये प्राधान्याने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर क्रमांक 101/26 मधील पाणबुडी पाण्याची मोटारीचे वायर 400 फूट किंमत अंदाजे वीस हजार रुपये, तसेच एक काळया रंगाची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल किंमत पन्नास हजार रुपये, जिचा चेसी नंबर 99 के 19 18 39 3 असा असून जुनी वापरातली चोरल्याचे कबूल केले. आणि ती पोलिसांना दिली. तसेच एक सुझुकी कंपनीची काळया रंगाची मोटर सायकल चेसी नंबर 9 00 756 949 38 जुनी वापरात असलेली किंमत दहा हजार रुपये, एक हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची मोटरसायकल जुनी वापरात असलेली किंमत पंधरा हजार रुपये, एक हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल जुनी वापरात असलेली किंमत 50 हजार रुपये, एक वन प्लस 11 5g कंपनीचा मोबाईल किंमत 40000 रुपये, एक विवो कंपनीचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये, दुसरा एक विवो कंपनीचा वाय 300 5g कंपनीचा मोबाईल किंमत वीस हजार रुपये, एक मोटो 906 पावर कंपनीचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये, एक टेक्नो कंपनीचा मोबाईल किंमत पंधरा हजार रुपये, पाणबुडी पाण्याच्या मोटर चे वायर 400 फूट किंमत अंदाजे 20,000 रुपये, एक मोटो 906 पावर कंपनीचा मोबाईल किंमत 15000 रुपये, एक टेक्नो कंपनीचा मोबाईल किंमत 15000 रुपये इतका ऐवज या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने जप्त केला आहे.
सदरची कारवाई ही लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सूचनेवरून गुन्हे प्रकटीकरण शाखेतील राम बनसोडे, संदीप केंद्रे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे तसेच लातूर येथील सायबर सेलच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजली गायकवाड यांनी संयुक्तरित्या कारवाई केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गजानन डफळे हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!