एन.एम.एम.एस.परीक्षेत प्राध्यापक गोपाळ कृष्ण घोडके यांच्या उदयगिरी अकॅडमीच्या २२ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथील विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सदैव सकारात्मक बदल घडवत विकासाचे पर्व गाठणारे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अग्रेसर असणारे उदयगिरी अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठले आहे.
8 वी इयत्तेतील मुलांसाठी लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवर केंद्र शासनातर्फे घेण्यात येणारी एन एम एम एस परीक्षेत उदयगिरी अकॅडमीचे एक दोन नव्हे तर तब्बल 22 विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थी नागेश वंगाटे, आदित्य ढवळे, प्रगती बुद्रे, हरिओम डोंगरे, प्रगती होनराव, अर्णव पंडित, अभिजित खंदाडे, रोशनी बिरादार, साईराज इंगळे, युवराज सावंत, तन्वी बोळेगावे, कृष्णा शिंदे, अधिराज पाटील,यश येनिले, अपेक्षा मोरे,अंजली जाधव, आरुष जीरोबे, अर्णव नळगिरे, ओमकार माका, सुमित पांडे,स्वराज वाघमारे, अक्षता सूर्यवंशी या पात्र विद्यार्थ्यांचा उदयगिरी अकॅडमीतर्फे फेटे बांधुन सत्कार करण्यात आला. पात्र झाल्यापैकी बहुतांश विद्यार्थी भारत सरकारतर्फे मिळणाऱ्या रु.6०,००० च्या शिष्यवृत्तीस पात्र ठरतील. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार उदयगिरी अकॅडमी चे संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके, प्रा. संतोष पाटील, डॉ. धनंजय पाटील, प्रा. गोविंद केंद्रे, प्रा. ज्योती खिंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी प्रा. श्रीगण रेड्डी, प्रा. नंदिनी नीटूरे, प्रा. निवेदिता भंडारे इ. उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी अकॅडमीतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
