कासार सिरसी येथील बस स्थानक उभारणीच्या कामाला सुरुवात; आमदारांनी दिलेलं वचन पूर्ण

कासार सिरसी येथील बस स्थानक उभारणीच्या कामाला सुरुवात; आमदारांनी दिलेलं वचन पूर्ण

कासार सिरसी (बालाजी मिलगीरे) : कासार सिरसी येथे श्रावणच्या मुहूर्तावर पहिला सोमवारचा योग साधून मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेला भव्य दिव्य असा बस स्थानक उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आले आहे.

कासार सिरसी परिसरातील नागरिकांचे व प्रवाशांचे अडचण लक्षात घेऊन औसा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी आमदार होण्याच्या अगोदर बस स्थानक उभारण्याचा वचन येथील जनतेला दिलेला होता ते पूर्ण करत असल्याचे दिसत आहेत.
विकास पुरुष लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या आदेशानुसार स्थानिक कार्यकर्त्यांच्या वतीने बस स्थानक नियोजित जागा साफ करून मारकाउंट घालून रांगोळी टाकून पदाधिकारी च्या हस्ते भूमिपूजन नारळ फोडून उदघाटन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाल्याच्या थोड्या दिवसातच या भागातील विकास कामाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे याहीपुढे अन्य प्रलंबित असलेल्या विकास कामे लवकरात लवकर पूर्ण होतील अशी आशा येथील जनता लावून बसली आहे.
या भूमिपूजना वेळी भारतीय जनता पार्टी संघटक धनराज होळकुंदे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी जिलानीभाई बागवान, राजु डोणगापुरे ग्रामपंचायत सदस्य गोरख होळकुंदे, विठ्ठल गुत्ता, अनिस बेडगे, मंडळ उपाध्यक्ष भास्कर पाटील,अनुसूचित जाती संदीप बनसोडे , गुत्तेदार मुकेश जाधव, किरण किवडे, धोंडीराम बिराजदार ,रायप्पा मंडले, साहेबा कानडे, पत्रकार ज्ञानेश्वर मडोळे, उमेश बुकले आनंद देवसाळे शंकर स्वामी, नागनाथ स्वामी फारुख भगवान, मोहन बरकंबे अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!