75 दिवसात जिल्ह्यातील सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करा – जिल्हाधिकारी

75 दिवसात जिल्ह्यातील सर्व कार्यालये व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करा - जिल्हाधिकारी

कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाणार

लातूर (प्रतिनिधी) : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते प्रमाण व त्याचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता राज्यात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावर निर्बंध घातलेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकिय, खाजगी कार्यालये सर्व शासकीय व खाजगी शाळा, महाविद्यालये तसेच खाजगी शिकवणी वर्ग इत्यादी तंबाखूमुक्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.या निर्बंधामुळे सर्व जिल्ह्यातील कार्यालये आणि शैक्षणिक संस्था ह्या तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्यामुळे कार्यालयीन परीसर विद्रुप होतो तसेच थुंकिद्वारे पसरणारे संसर्गजन्य रोगावर आळा आणता येऊ शकतो. सर्वांनी या सुचनांचे काटेकोर पालन करावे असेही आवाहन जिल्ह्याधिकारी बी.पी. यांनी केले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस उपअधिक्षक अनुराग जैन, जिल्हा शल्य चिकित्सक, डाॕ.लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनमंत वडगावे, निवासी वैद्यकीय अधिकारी डाॕ.सतिष हरिदास, जिल्हा शिक्षण अधिकारी श्री व्ही. व्ही दशवंत, वैद्यकीय अधिकारी मनपा, डॉ. माले, वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद कलमे व सर्व तालुक्यातील गटशिक्षणअधिकारी यावेळी उपस्थित होते.

सार्वजनिक ठिकाणी तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थेच्या शंभर यार्ड परीसरात धुम्रपान तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणे अथवा विक्री करणे कोटपा २००३ कायद्यानुसार प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तंबाखू दानपेटी ठेवण्यात यावे. कार्यालयात प्रवेश करण्याच्या आधी सर्व प्रकारचे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ या दान पेटीत टाकूनच कार्यालयात प्रवेश करावा लागणार आहे. कार्यालयात तंबाखू सेवन केल्यास किंवा सोबत बाळगल्यास कोटपा कायद्यातील तरतुदीनुसार संस्था प्रमुखामार्फत दोनशे रुपये दंड आकारला जाऊ शकतो. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कार्यालय व परिसरात कोणत्याही प्रकारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे.

जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि यांनी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे निकष पुर्ण करुन ७५ दिवसात जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!