लसाकमच्या वतीने साठे जयंती साजरी

लसाकमच्या वतीने साठे जयंती साजरी

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ (लसाकम) च्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ यांची जयंती १०२ वी जयंती साजरी करण्यात आली. तालुका शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.एम.जंगापल्ले तर प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश डबीर, अंनिसचे प्रधान सचिव प्रा.रत्नाकर नळेगावकर,फेरोज शेख,मुख्याध्यापक ग्यानोबा घोसे,सुग्रीव बेले आदी उपस्थित होते.सुरेश डबीर यांनी अण्णाभाऊ हे प्रतिभावान, विद्वान साहित्यिक असताना शुध्दा जातीय व्यवस्थेचे बळी ठरल्याची खंत व्यक्त केली. प्रा रत्नाकर नळेगावकर यांनी अण्णाभाऊंचे साहित्य लढायला शिकविते असे सांगितले. बालाजी जंगापल्ले यांनी अध्यक्षीय समारोपर भाषणात अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दल मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक तालुकाध्यक्ष राजकुमार गोंटे, सुत्रसंचालन नरसिंग सांगवीकर यांनी तर आभार विश्वांभर जिवारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वप्नील मेकाले,संकेत मेकाले आदींनी परीश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!