गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ

गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील खोपेगाव येथे दि 05 ऑगस्ट 2022 रोजी 2021-22 मध्ये मंजूर झालेल्या पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ लातूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी तुकाराम भालके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी कोळपे साहेब, घरकुल विभागाचे अधिकारी वंजारे, सरपंच तेजाबाई शिवाजीराव मोरे, जिल्हा साहित्य मुद्रालयचे चेअरमन लक्ष्मण मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष विलास मोरे, गोविंद गायकवाड, चंद्रकला इंगळे, शंकर डेंगळे, कृष्णा शिंदे, निवृत्ती सादले, बब्रुवान पवार, उत्तम मोरे, इंजिनिअर हाडोळतीकर मॅडम, पठाण साहेब, ग्रा.प.सदस्य विनायक डेंगळे, बालाजी म्हत्रे, ग्रामरोजगार सेवक अमोल घायाळ, रमेश मोरे, रवी मोरे, दामोदर शिंदे, ग्रा.प.कर्मचारी दिपक मोरे, अभिषेक मगर व घरकुल चे सर्व लाभार्थी तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!