तळहातावर शीर घेऊन लढणाऱ्या सुभेदारांना सलाम – दिलीप भंडे
उदगीर (एल.पी.उगिले) : देशाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला जीव तळहातावर घेऊन देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांना सर्व भारतीयांचा मानाचा सलाम, उदगीर तालुक्यातील कुमदाळ या छोट्याशा गावचे कर्तबगार सुभेदार हनुमंत भंडे हे आपल्या दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होऊन परतले आहेत.
या गावची पराक्रमाची आणि कर्तुत्वाची जपवणूक त्यांनी केली आहे. गावच्या आदर्शाचा वारसा त्यांनी जपला आहे. संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारत देशाला पर्यावरण प्रेमी, कृषी प्रधान गाव म्हणून कुमदाळ या गावची ओळख आहे. त्या गावच्या या महापुरुषाला मानाचा सलाम करतो आणि बजावलेल्या सेवेबद्दल त्यांचा गौरव करतो, या भाषेत कुमदाळचे उपसरपंच दिलीप भंडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सांगितले.
सुभेदार हनुमंत भंडे यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतर गावकऱ्यांनी गावात वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली. इतकेच नव्हे तर उदगीर शहरात विविध प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते सुभेदार हनुमंत भंडे यांचा यथोचित गौरव आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुमदाळ गावचे उपसरपंच दिलीप भंडे हे उपस्थित होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे ,उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे, प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेचे श्रीमंत सोनाळे, शिवसेनेचे उदगीर तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, पोस्ते पोद्दार लर्न स्कूलचे प्रिन्सिपल सूर्यकांत चवळे, संचालक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, प्रहार महिला आघाडी लातूर जिल्हा अध्यक्ष कांचन भोसगे, प्रहार उदगीर तालुका अध्यक्ष विजयमाला पवार, देवर्जनचे सरपंच चंद्रप्रकाश खटके, प्रहार पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, प्रहार पक्षाचे उदगीरचे तालुकाध्यक्ष रवीकिरण बेळकुंदे, तालुका संपर्कप्रमुख सुनील केंद्रे, तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपोळे, तालुका उपाध्यक्ष संदीप पवार, तालुका सचिव अविनाश शिंदे, शहर सहसचिव बालाजी बिरादार, तालुका संघटक सोपान राजे, प्रशांत आडे, तालुका चिटणीस सुदर्शन सूर्यवंशी, तालुका प्रसिद्धीप्रमुख अभय कुलकर्णी, बळीराम चौधरी, नळगीर सर्कल प्रमुख तुळशीदास तेलंगे, तालुका सरचिटणीस आनंद गव्हाणे,डॉ. बब्रुवान मोरे माजी सैनिक कल्याण केंद्र सदस्य व रुईवा बटालियन आजी-माजी सैनिक व सेवानिवृत्त कॅप्टन बालाजी बिरादार यांच्या हस्ते सुभेदार हनुमंत भंडे यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय सेनेमध्ये 28 वर्ष देश सेवा करून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. बेळगाव ट्रेनिंग सेंटर सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा हा सत्कार करण्यात आला होता. उदगीर शहरातील परमेश्वरी मंगल कार्यालय या ठिकाणी या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडेप्पा पडसलगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.