स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणीच्या मोफत शिबीराचे आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणीच्या मोफत शिबीराचे आयोजन

परळी वैजनाथ (गोविंद काळे) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणीच्या मोफत करण्यात आले आहे. श्री नाथ हॉस्पिटल येथे सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र याठिकाणी या मोफत शिबीराचे 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आयोजन केले. जास्तीत जास्ती नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे आरोग्य मित्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीत नोंदणीच्या मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीतील नोंदीशी जोडला जाणार आहे. मात्र आधार क्रमांक जोडणे ही बाब ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. यासाठी नमुना क्रमांक 6 ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादीतील नोंदीशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदी कमी होणार आहेत व मतदार यादी शुध्दीकरणाच्या कामात यामुळे मदत होणार आहे. प्रत्येक मतदारांकडून आधार क्रमांक विहीत स्वरुपात व विहीत रितीने मिळविण्यासाठी वैधानिकरित्या मतदार नोंदणी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. यासाठी अर्ज क्र. 6 ब च्या छापील प्रति मतदारांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना आधार क्रमांक भरण्यासाठी अर्ज क्र. 6 ब ERO net, GARUDA App, NVSP, VHP या माध्यमांवर देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मतदार यादीशी आधार क्रमांकाची जोडणी करणे ऐच्छिक आहे. तरी परळी मतदार संघाहातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदारांनी आधार क्रमांकाची जोडणी करावी. शहरातील श्री नाथ हॉस्पिटल येथे सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे (9158363277) याठिकाणी या मोफत शिबीराचे आयोजन केले. जास्तीत जास्ती नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय मुंडे आरोग्य मित्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.

About The Author