संतसमाज सुधारकांचा चळवळीचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाऊ – डॉ. धीरज देशमुख
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील प्रोगामी विचाराच्या महाराष्ट्राल स्वातंत्र्याच्या 75 वा अमृत महोत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत. असताना विवेकी समाज घडवणे हे तितकच आपल्यावर मोठी जबाबदारी असून अनेक परंपरा रुढीला आपण तिलांजली देऊन अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत समाज सुधारकांचा वारसा मोठ्या जोमाने पुढे घेऊन जात आहोत.अंनिस संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृति विशेष अंकाचे प्रकाशन करतेवेळी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ धीरज देशमुख बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे अशोकराव चपटेसर हे होते. पुढे बोलताना डॉ देशमुख म्हणाले की येत्या 20 ऑगस्टला डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 9 वर्षे पूर्ण होत. अजूनही मुळ आरोपी सापडत नाही. हे मोठे खंतअसून येणाऱ्या काळामध्ये विवेकी समाज घडवणे काळाची गरज आहे. हे अंनिसचे काम सोपे नसून प्रवाहाच्या विरोधात काम करणे आहे. स्वातंत्र्यदिनी 9 ऑगस्ट 1989 ला दाभोळकरांनी काही मोजके साथी घेऊन हे संघटना चालू केली होती. त्याला आज 33 वर्षे पूर्ण झाले आहेत. शाळा महाविद्यालय च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही विवेकी चळवळ दाभोळखराने आपल्या जीवाचे अहो ती देऊन प्रचार व प्रसार केलाअसून संतसमाजसुधारकांचा वारसा मोठ्या जोमाने अंनिसचे कार्यकर्ते आम्ही वारस विवेकाचे तन-मन-धनाने चालवत आहेत. हे अभिमानाची गोष्ट आहे. संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा रत्नाकर नळेगावकर तर प्रस्तावना मेघराज गायकवाड यांनी केले. यावेळी अजहर बागवान. ईमरोज पटवेकर. महेश कानगुले. तानाजी राजे.अनिस बागवान.अमोल कानगुले. गौरीशंकर बरुडे. सुनील चव्हाण या कार्यक्रमाचे आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले यावेळी आदीची उपस्थिती होती.