उदगीरात संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, ॲड.रवि शिवाजीराव इरले यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्यल सत्कार संपन्र

उदगीरात संत तुकाराम विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, ॲड.रवि शिवाजीराव इरले यांची न्यायाधीश पदी निवड झाल्याबद्यल सत्कार संपन्र

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळद्बारा संचिलीत, संत तुकाराम विधी महाविद्यालयातील विद्याथीॅ, ॲड रवि शिवाजीराव इरले, हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उतीर्ण होवुन न्यायधीश पदासाठी त्याची निवड झाल्यामुळे संत तुकाराम महाविद्यालयातील एलएल बी.प्रथम वर्षाचे विद्याथीॅ, योगेश बसुदे सत्यम खोमणे, ज्ञानेश्वर हाराळे,गोंविद दांडे,अमोल राळेभात,किरण पौळ,संजय वाघमारे,अतिश सातपुते,अनिल चोले,अमोल अंगसारे,तुषार अंतरेडी,डाॅ. संजय दुधमल,निखील कलशेट्टी काजी रियाज,संतोष आग्रे,प्रविण कोरे,जुबेर बिरादार,गौतम हळ्ळीखेडे,परमेश्वर ढगे,वर्षा रद्देवाड, गौरव बयास,,गायकवाड पि.एम., संतोष जाधव,मनोहर पांडे, आदिनाथ स्वामी याच्या वतिने सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ॲड. रवी इरले म्हणाले की, त्यांचे वडील कै. ॲड. शिवाजीराव बाबुराव इरले याची इच्छा होती की “त्यांचा रवि हा एक दिवस सुर्या सारखा न्यायधिश म्हनुण चमकावा” आणि आज ते स्वप्न साकार झाले.
अहमदपुर तालुक्यातील मौजे. चिखली गावचे रहिवासी असलेले कै. ॲड. शिवाजीराव बाबुराव इरले याच्या घरी श्री रवि इरले यांचा जन्म झाला, त्यांनी तुकाराम विधी महाविद्यालयामधून आपली बी. एस. एल. एलएल. बी. पदवी संपादन केली व एलएल. एम. पदवी मुंबई विद्यापीठातून संपादन केली. मुंबई उच्च न्यायलयात वकिली करत असताना महाराष्ट्र लोकसेवा अयोगा मार्फत होणार्‍या न्यायधिश पदाची परिक्षा उतीॅर्ण होवुन त्यांची न्यायधीश पदी निवड झाली असे श्री रवि इरले म्हणाले. यावेळी महाविद्यालयातील एल एल. बी. प्रथम वर्षाचे सर्व विद्याथीॅ, श्री ॲड. संतोष आग्रे, मुंबई उच्च न्यायालय व आदरणीय प्राध्यापक श्री. ॲड. राजकुमार नावंदर सर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!