स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव उत्साहात साजरा

स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव उत्साहात साजरा

उदगीर : पतंजली योग समिती, उदगीर यांच्या विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच 15 ऑगस्ट चा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रा. बसलिंग गारठे यांनी ध्वजारोहण केले. त्याचबरोबर वरिष्ठ नागरिक,योगशिक्षक, लक्ष्मणराव आंबेसंगे यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन केले,नंतर सामूहिक राष्ट्रगीत झाले. याप्रसंगी राज्य संयोजक प्रभारी धनराज बिरादार यांनी अमृत महोत्सवाबद्दल माहिती सांगितली.
हर घर तिरंगा याबद्दलची संकल्पना स्पष्ट केली, त्यानंतर महिला प्रभारी सौ मीनाक्षीताई स्वामी, व पंतजलि परिवारातील, सर्व महिलांनी भगिनी यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सर्वांना राखी बांधून करून साजरा केला. याप्रसंगी सौ. लक्ष्मीबाई अंबेसंगे,सौ कबाडे बाई,सौ सुमती भातांब्रे ताई, सुमनदेवी चव्हाण ताई, जाधव ताई व इतर बऱ्याच भगिनी उपस्थित होत्या त्याशिवाय वरीष्ठ नागरिकांमध्ये बाबुराव माशाळकर , हणमंतराव औरादे आप्पा , नगरसेवक साईनाथ चीमेगावे, शिवकुमार शिरगिरे,महामंत्री श्रीराम चामले.उमाकांत अंबेसंगे,चांबोळे संगमेश्वर , मंगेश शिरगिरे , अॅड. बेदडे व छोटी बालके या ठिकाणी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!