राजीव गांधी सद्भावनेचे प्रतीक व माहिती तंत्रज्ञानाचे जनक होते – प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : जातीय, प्रांतिय, धार्मिक तसेच भाषीय भेदभाव दूर करून मानवता हाच आपला धर्म समजून सर्व भारतीयांमध्ये सर्वांप्रति सद्भावना निर्माण करण्याचे कार्य तत्कालीन युवा पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी केले. ते सद्भावनेचे प्रतीक व माहिती तंत्रज्ञानाचे जनक होते. असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर होत असे की अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या ७८ वी जयंती निमित्त सदभावना दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील होते तर उपप्राचार्य डॉ.डी.डी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी सद्भावना दिना निमित महाविद्यालयातील प्राध्यापक , कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांना ‘सद्भावना प्रतिज्ञा’ दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपा प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील पुढे म्हणाले की, आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जगात भारताची जी ओळख आहे. त्याचे सर्व श्रेय राजीव गांधी यांना जाते. ते भविष्यदृष्टा होते म्हणूनच त्यांनी माहिती तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊन रोजगार निर्मितीचे नवीन क्षेत्र निर्माण केले. असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी डॉ. सतीश ससाणे, डॉ. मारोती कसाब , प्रो. डॉ. अभिजीत मोरे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. सचिन गर्जे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थीनी मोठया संख्येंने उपस्थित होते.
