कासार सिरसी येथील हनुमान मंदिर ते ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर रोज अपघात
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसी ते उमरगा जाणाऱ्या मार्गावर हनुमान मंदिर ते ग्रामीण रुग्णालय या आरुंद रस्त्यावर रोज अपघात होत असल्याने रस्त्याचे रुंदीकरण व डीव्हायडर करण्याची विनंती येथील नागरिक करत आहेत. या रस्त्यावर मोठी वर्दळ असल्याकारणाने तिथे अनेकदा अपघात झालेले आहेत हा रस्ता उस्मानाबाद जिल्हा ते लातूर जिल्हाला जोडणारा मुख्य रस्ता असल्याकारणाने या रस्त्यावर खूप मोठी वर्दळ आहे व तसेच कासार सिरसी गाव लगत या रस्त्यावर ग्रामीण रुग्णालय, दोन शाळा, मंगल कार्यालय, पोलिस कॉटर, जिंदावली दर्गा, दोन हात पंप एक पेट्रोल पंप, दोन धाबे तीन बार रेस्टॉरंट, मोठी वसाहत असल्याकारणाने या रस्त्यावर मोठी वर्दळ आहे. परंतु हा रस्ता एकेरी असून या रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे वाढल्याने हा रस्ता अरुंद झाल्याकारणाने याठिकाणी सतत छोटे-मोठे अपघात होत असताना दिसून येत आहे.या रस्त्यावर मागील वर्षी झालेल्या दोन अपघातात तीन व्यक्ती मयत झाले आहेत या रस्त्यावर येणाऱ्या काळात अनेक छोटे-मोठे अपघात होऊन मोठी नुसकान होऊ नये यासाठी, हा जीवघेणा प्रवास थांबविण्यासाठी, व तसेच जनतेचे सुखरूप प्रवास व्हावा यासाठी, शासन-प्रशासन व येथील लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष घालून येथील शहरा लगत हनुमान मंदिर चौक ते ग्रामीण रुग्णालय पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण वाढून मध्यभागी डीव्हायडर डर करून जनतेचे सुखरूप प्रवास होण्यासाठी सहकार्य करावे अशी येथील नागरिक विनंती करीत आहेत.
