महात्मा फुले महाविद्यालयातून घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताहाचा प्रारंभ

महात्मा फुले महाविद्यालयातून घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताहाचा प्रारंभ

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व नगरपरिषद अहमदपूर च्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताहाचा प्रारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की १७ सप्टेंबर २०२३ रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामाला दिनाला ७५ वर्ष होत असल्याने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय लातूर, नगरपरिषद अहमदपूर व महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने घनकचरा व्यवस्थापन व प्लास्टिक बंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह अंतर्गत प्लास्टिक बंदी बाबत सामूहिक शपथ, शहरात जनजागरण करण्यात येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, प्रो. डॉ.अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ. अभिजीत मोरे यांच्यासह नगर परिषदेचे धम्मपाल ढवळे, राहुल चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!