यशवंत विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत साथ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

यशवंत विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत साथ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

अहमदपूर (गोविंद काळे) : दि.31 08 22 19 जून 2022 रोजी झालेल्या एन एम एम एस राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून नेत्रदीपक यशाची परंपरा कायम केलेली आहे. यात धनश्री साबळे, विशाखा दाभाडे, आदिती केंद्रे, सायली भगत, धनराज हंगरगे, किशोर माने, विशाल केंद्रे हे सात विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून त्यांना शासनाच्या वतीने वर्ग नववी, दहावी, अकरावी आणि बारावी या चार वर्षासाठी प्रतिवर्षी 12 हजार रुपये केंद्र शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख संतोष मालवदे, आनंद कुमार चोचंडे, लक्ष्मण फड, अमोल लगड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले होते. या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव सांगवीकर सचिव शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, परवेक्षक उमाकांत नरडीले, दिलीप गुळवे, रामलिंग तत्तापूरे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author