आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरा करण्यासाठी चलो भिवडी – जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील
कासार सिरसी (बालाजी मिलगिरे) : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची येत्या 7 सप्टेंबरला 231वी जयंती साजरा करण्यात येत आहे तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जय मल्हार क्रांती संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील यांनी केले आहे. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या 7 सप्टेंबरला राजांच्या जन्म गावी भिवडी ता. पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी शासकीय जयंती साजरा करण्यात येत आहे तरी लातूर जिल्ह्यातील,धाराशिव जिल्ह्यातील व तसेच सीमा भागावरील समाज बांधव व बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान व विनंती लातूर जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.
एक दिवस आपल्या राजासाठी
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा, श्री, रामदास आठवलेसाहेब केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. श्री, अतुलजी सावेसाहेब ओ बी सी मंत्री महाराष्ट्र राज्य,श्री, प्रकाशशेठ धरीवलसाहेब शिरूर उपनगराध्यक्ष, मा. गिरीशजी बापट साहेब पुणे खासदार, मा,प्रवीणजी दरेकर साहेब, मा. श्री, रामभाऊ शिंदे, मा. गोपीचंद पडळकर साहेब, मा. अभिमन्युजी पवार साहेब, श्री. रमणजी खोमणे, श्री.चंद्रकांत खोमणे, श्री. आबासाहेब जाधव, अन्य मंत्री माजी मंत्री आजी-माजी खासदार आमदार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी असे दिग्गज महोदय आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत तरी राजांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या जन्मगावी समाधीस्थळावर वंदन करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. तरी बहुजन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अध्यक्षच्या वतीने आवाहन यावेळी करण्यात आले.