निम्न तेरणा प्रकल्प, माकणी येथील जलसाठ्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते जलपुजन संपन्न
धाराशिव (सागर वीर) : आज दिनांक 07/092022 रोजी मा. खासदार श्री. ओमदादा राजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते निम्न तेरणा प्रकल्पांच्या जलसाठाचे पूजन करण्यात आले असून, सोबत माकणी देवस्थानचे श्री. महेशमहाराज यांच्या साक्षीने सुगंधी पुष्प आणि नारळ अर्पण करून निम्न तेरणा प्रकल्प, माकणी येथील जलसाठ्याचे जलपुजन केले. याप्रसंगी सदरील पाणीसाठ्याचे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याबाबत तसेच लगतच्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याबाबत योग्य प्रकारे नियोजन करण्याबाबत लाभक्षेत्र प्राधिकरण कार्यालयाचे अधिक्षक अभियंता तथा प्रशासक श्री अभिजित म्हेत्रे, श्री रोहित जगताप कार्यकारी अभियंता व उपअभियंता श्री नितिन बी पाटील यांना सुचित केले तसेच येणाऱ्या दोन महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसाच्या वेळी धरणालगतच्या गावांना धोका होणार नाही याची गांभिर्याने दखल घेण्याबाबत खा. ओमराजे निंबाळकर यांनी निर्देश दिले. राजेगाव येथील राजेगाव निम्न पातळी को. पा. बंधाऱ्याची पाहणी करुन शेतकऱ्यांच मागणीनुसार बंधाऱ्यावरील रस्त्याची रुंदी वाढवण्याबाबत संबंधीतांना निर्देश दिले.
या प्रसंगी माकणी, मातोळा, सास्तुर, उजनी व धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांसह कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपअभियंता नितीन पाटील यांच्यासह अमोल बिराजदार, ज्ञानेश्वर तात्या पाटील, दिपक जवळगे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, सरपंच गोकुळ नानाराव मोरे, उपसरपंच पवन दयानंद मोरे, गुलाब (आप्पा) मोरे, दिलीप मोरे, भालचंद्र मोरे, काशिनाथ मोरे, भैय्यासाहेब माटे, दादासाहेब मोरे, शुभम पाटील, महेश पाटील, प्रसाद पाटील, रोहित बेंद्रे, किशोर बेंद्रे, मुरली देशमुख, प्रशांत मोरे, प्रदीप मोरे, गजानन मोरे, विश्वजीत देशमुख, शाम नारायणकर, राम भालके, विलास मोरे, गोविंद कस्पटे, प्रशांत लांडगे, गणेश मोरे, राजेंद्र स्वामी, अरूण बेंद्रे, निलेश पवार, अनिकेत राठोड, सरपंच सुरेश देशमुख, विलास देशमुख, विशाल सुरवसे, अमर देशमुख, गोविंद देशमुख, कमर शेख, विष्णू माने, सचिन देशमुख, गहिनीनाथ सुरवसे, नेताजी सुरवसे, अमोल देशमुख, बालाजी देशमुख, बाळासाहेब देशमुख, तुकाराम सुरवसे, गुंजोटी तलाठी कोकाटे, साहेब कृषी सहाय्यक बिराजदार साहेब, ग्रामसेवक मोरे साहेब, नितीन पाटील साहेब, वजीर शेख, विष्णू माने, तंटामुक्त अध्यक्ष धनराज पाटील, रवींद्र घंटे, प्रविण देशमुख, मनिश घंटे, लोहारा तालुक्याचे तहसिलदार, महावितरणचे अधिकारी, पोलिस अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.