लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या निवडी जाहिर

लातूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या निवडी जाहिर

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या लातूर शहरातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील आणि अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष अॅड.महम्मद खान यांच्या आदेशाने व लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या निवडी अल्पसंख्यांक शहरजिल्हाध्यक्ष टिल्लू शेख यांच्या नेतृत्वात संपन्न झाल्या. सदर निवडी प्रदेश सचीव मुर्ताझा खान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक मुफ्ती फैय्याज, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे सदस्य बरकतभाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष समीर शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष विशालजी विहीरे, जहाँगीर शेख, प्रविणसिंह थोरात, अफरोज शेख, डी.उमाकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या. यावेळी मुन्ना खान (शहर जिल्हाकार्याध्यक्ष), अॅड.जिब्राईल पठाण, अझरोद्दीन शेख यांची उपाध्यक्ष पदी, मुस्ताफा किल्लारीकर, अर्शद पठाण, सविनय शिंदे, तैमुर शेख, साहिल तांबोळी यांची लातूर शहर जिल्हा सचीव, तर जफर शेख यांची प्रभाग क्र.12, आकाश मस्के यांची प्रभाग क्र.14 च्या अध्यक्षपदी निवड नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!