८४ लक्ष ३७ रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व ६० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण संपन्न

८४ लक्ष ३७ रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व ६० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे घरोळा ता. चाकूर येथे ८४ लक्ष ३७ रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि ६० लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. तसेच ग्रामस्थांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला. ८४ लक्ष ३७ हजार रूपयांच्या विविध भूमिपूजन विकासकामांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईन व पाण्याची टाकी ५५.६२ लक्ष, जनसुविधेअंतर्गत ९.२५ लक्ष सिमेंट रस्ता, नवीन अंगणवाडी इमारत ८.५० लक्ष, सामाजिक न्याय योजनेअंतर्गत तांडावस्ती सिमेंट रस्ता ६ लक्ष, घनकचरा व्यवस्थापन ५ लक्ष कामाचा भुमीपूजन समारंभ आणि ६० लक्ष रूपयांच्या विविध विकास कामांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावा अंतर्गत पाईपलाईन १५ लक्ष, जिल्हा परिषद शाळेचे बांधकाम १२.५० लक्ष, १५ वा. वित्त अयोग गाव अंतर्गत पेव्हर ब्लॉक १२ लक्ष, १५ वा वित्त अयोग गाव अंतर्गत बंदीस्त नाली ७ लक्ष, १५ वा वित्त अयोग आरो फिल्टर ६ लक्ष. (२ नग), जनसुविधे अंतर्गत सिमेंटरस्ता ५ लक्ष, १४ वा वित्त अयोग सिमेंट रस्ता ३ लक्ष, गाव अंतर्गत शिवरस्ते १० किलोमीटर माती कामाचे लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच नागोराव पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंद सुरवसे, तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भानुदासराव पोटे, अनिलराव वाडकर, चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, सामाजिक न्याय अध्यक्ष विष्नुकांत तिकटे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक चाकूरबिलाल पठाण, राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष नागेश बेरोळे, विद्यार्थी रा.ता. अध्यक्ष समाधान जाधव, चेअरमन इब्राहिमसाब चौधरी, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक बुर पटेल, सचिन तोरे, सेवादल उपाध्यक्ष कासिम पटेल, सरपंच लक्ष्मण सुर्यवंशी, उपसरपंच शरद जाधव, जनार्दन जाधव, चेअरमन प्रदिपराव जाधव, हणमंत मोहिते, उमाकांत अप्पा बुक्के, मनोज, पशामिया सय्यद, इस्माईल शेख, शिवाजी शिंदे, वसंतराव उळागुडे, मनोज जाधव, रमाकांत जाधव, जनार्दन सुर्यवंशी, चंद्रकांत बिराजदार, विवेकानंद जाधव, आनंदराव शिंदे, दिगंबर जाधव, जीवनराव जाधव, गोपाळ पवार, महेश जाधव, रमेश जाधव, बालाजी सुर्यवंशी, माधवराव भोसले, गोविंद सुर्यवंशी, नागनाथ कुंभार, ज्ञानोबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!