मेथी ग्रामपंचायत बिनविरोध निवडीची हॅटट्रिक

मेथी ग्रामपंचायत बिनविरोध निवडीची हॅटट्रिक

सरपंच पदी सौ. लता धनराज कोडंगिरे अहमदपूर (गोविंद काळे) : मौजे मेथी ता. अहमदपूर येथील ग्रामपंचायत निवडणूक ही मागील दोन वेळेस एस सी संवर्गातील हणमंत तपघाले व ओबीसी संवर्गातील संतोष सुडे यांची सरपंच पदाची व सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. तसेच याही सन २०२२-२३ ते २०२७-२८ या चालू पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोधची परंपरा कायम राखत ओपन,ओबीसी,एस सी,एनटी या समाजातील सर्व गावकरी मंडळींनी मिळून अतिशय उत्साहामध्ये बहुमताने ग्रामपंचायतीची बिनविरोध निवड करून खुल्या संवर्गातील सौ. लता धनराज कोडगिरे (पाटील) यांची सरपंच म्हणून तसेच सुडे शोभा कालिदास, तपघाले कौशाबाई वामन, उज्वला पांडुरंग ठाकरे, शिंदे गंगाधर, शेख बेबीफातिमा रफिक, चोपडे अश्विनी वसंत, तपघाले ज्ञानोबा, यांची सदस्य म्हणून निवड करून बिनविरोध निवडीची हॅटट्रिक साधुन विक्रम केला आहे. या निवडीबद्दल बाबुराव जाधव सर, संजय सुडे, बाबुराव वाडकर, शिवराज माने सर, कांताप्पा खोंडे, भीमराव जाधव, रमेश खोंडे, दिलीप ठाकरे, बलभीम जाधव,विजय तपघाले, दिगंबर जाधव, अविनाश जाधव, सचिन सुडे, राम हंगरगे, संतोष इरलपल्ले, रुपेश जाधव, धनराज कोडगिरे, सुर्यकांत तपघाले, बालु भालेराव, मधुकर तपघाले तसेच मेथी गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्साहाने सहभाग घेऊन निवड झालेल्या सरपंच सदस्याचे सर्वानी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!