स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले यात 51 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले यामध्ये स्वराज्य गणेश मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्तांनी रक्तदान केले तत्पूर्वी शिबिराच्या उदघाटनास प्रदीप जी काळे उपकार्यकारी अभियंता, सतीश जी गुडे सहाय्यक अभियंता, अभय मिरकले माजी नगरसेवक, कुणाल समृतवाड, विष्णुजी कोरडे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष जी मजगे, यावर्षीचे अध्यक्ष संकेत गिरी उपाध्यक्ष धनंजय बोराडे आशिष होनराव सचिव पंकज गंगथडे व इतर सदस्य गजानन सोमवंशी, राहुल भालेराव, शिवराज चोतवे, सुनील देशमुख, संदेश डावरे, विशाल राठोड, दीपक मजगे राजू जाधव, विवेक स्वामी, मारुती हेमनर बालाजी कानवटे, राम केंद्रे, नागरगोजे मामा, फयुम शेख ,नरसिंग पामुलावार सुदर्शन हालसे, दत्तात्रय गंगथडे सुरेश सोनकांबळे, दत्ता परांडे, महेश जाधव, रमेश जाधव ऋषी पामुलावार बाळू तोगरे, प्रल्हाद बुधवारे, महेबुब शेख,बाळू होनाले कैलास लिंबाळे संतोष लांडगे सुरेश अप्पाकाडवादे अमर वलांडे, विशाल भालेराव,शिरीष हेंगणे आदींची उपस्थिती होती. सदरील रक्तसंकलनास लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पतपेढीनी अतिशय सुंदर पध्दतीने रक्तसंकलन केले यात डॉ. कांचन भोसले, डॉ सुमित कमलवाड, डॉ सिद्धेश्वर चौधरी वैद्यकीय अधीक्षक, बी डी सूर्यवंशी, हणमंत देडे आदींनी परिश्रम घेतले.
