संस्कार मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
शिरूर ताजबंद (गोविंद काळे) : येथील संस्कार मॉडेल स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. या निमित्ताने इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर शाळेचा कारभार पाहिले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिवसभर शाळा चालवली. शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून संकेत उडतो तर उपमुख्याध्यापक म्हणून कुमारी मयुरी पवार व अथर्व गुणाले यांनी तर शिक्षक म्हणून जवळपास 12 ते 15 विद्यार्थ्यांनी काम पाहिले, कलमे अर्णव आणि देवकर गणेश यांनी सेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली. तत्पूर्वी देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात आली, तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे व आज शिक्षक म्हणून कार्य केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने शाळेचे संचालक दत्ता घारगे व संचालिका निवेदिता घारगे यांनी सर्वांचे वेगवेगळ्या भेट वस्तू देऊन गौरव केले, या कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
