विष्णू सोलंकरची युएई मध्ये सायबर सेक्युरिटी इंजिनिअर म्हणून निवड झाल्याने सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी (सु) येथील पु अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी विष्णू बापूराव सोलंकर या विद्यार्थ्याची नुकतीच यु ए ई मध्ये बिझनेस वायर नेट क्रॅकर ॲन्ड एन सी कार्पोरेशन युएई मध्ये सायबर सेक्युरिटी इंजिनिअर या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली. त्यामुळे या माजी विद्यार्थ्याचा त्याच्या पालकासह सत्कार शाळेत संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या रेखाताई तरडे हाके यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी विष्णू सोलंकर या विद्यार्थ्याने शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्या रेखाताई तरडे यांनी मनातून अभ्यास केला व शिक्षकांनी शिकवलेला भाग मुलांनी आत्मसात केला तर विद्यार्थी निश्चितच मोठा बनतो असे सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून दै पुण्यनगरीचे उजना गणाचे पत्रकार म्हणून निवड झाल्याने नरसिंग कोंडेवाड यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन संतोष मुळे यांनी केले तर आभार जिलानी शेख यांनी मानले.याप्रसंगी राजकुमार बुर्ले, तुकाराम शिंगडे, प्रदीप रेड्डी, अमोल सारोळे, जनार्दन मासुळे,कौशल्या देवकते, अच्युतराव सुरनर, रमेश चेपूरे, संभाजी दुर्गे, दैवशाला शिंदे, मिनल गोगडे, चिंतन गिरी, यांच्या सोबतच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
