पत्रकाराच्या धरणे आंदोलना समर्थनार्थ मनसे रस्तारोको आंदोलन करणार- संजय राठोड

पत्रकाराच्या धरणे आंदोलना समर्थनार्थ मनसे रस्तारोको आंदोलन करणार- संजय राठोड

उदगीर (एल.पी. उगिले) : गेल्या 55 दिवसापासून उदगीर शहरातील नांदेड बिदर या मुख्य रस्त्या लगतचे पक्के अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी उदगीर पत्रकारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे या मागणीच्या पूर्ततेसाठी त्यांनी राज्यपाल,आयुक्त,जिल्हाधिकारी,बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदने देऊन वारंवार विनंती करूनही तसेच बेमुदत धरणे आंदोलनाच्या 55 दिवसानंतर ही उदगीर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जागी करण्यासाठी तसेच उदगीर पत्रकारांच्या न्याय मागणीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उदगीर दिनांक 9-10- 2022 वार शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी चौक उदगीर येथे रस्ता रोको आंदोलन करत असून या उपरही याविषयी ठोस निर्णय होत नसेल तर भविष्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अति तीव्र आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी. असे निवेदन उपजिल्हाधिकारी याना देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड,तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शहराध्यक्ष अभय सुर्यवंशी, शहर उपाध्यक्ष संतोष भोपळे, लखन पुरी, रोजगार सेना तालुकाध्यक्ष रामभाऊ कांबळे,शेतकरी सेना तालुकाध्यक्ष बापुराव जाधव,चंद्रकांत गठडे,संतोष बालने,नामदेव राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!