पंडितराव सुकनीकर यांची शामलालच्या शालेय समितीवर निवड

पंडितराव सुकनीकर यांची शामलालच्या शालेय समितीवर निवड

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील ख्यातनाम असलेल्या श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शालेय समितीवर शिक्षण तज्ञ म्हणून प्राध्यापक पंडितराव सुकणीकर यांची निवड करण्यात आली आहे. पंडितराव सुकणीकर हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असून माजी पालकमंत्री तथा भाजपाचे नेते आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात.
यापूर्वीही पंडितराव सुकणीकर यांनी शालेय समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या शैक्षणिक अनुभवाचा फायदा संस्थेला व्हावा, या उदात्त हेतूने संस्थेच्या कार्यकारिणीने त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, सचिव ऍड. विक्रम संकाये, सहसचिव सौ अंजुमनीताई आर्य,मुख्याध्यापक आनंद चोबळे अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!