NEET परीक्षेत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग भरारी

NEET परीक्षेत लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाची उत्तुंग भरारी

840 विद्यार्थ्यांपैकी 752 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र

दयानंद चा निखील नावंदर नीट परीक्षेत ६५२ गुण घेवून महाविद्यालयात प्रथम

लातूर (प्रतिनिधी) : शैक्षणिक गुणवत्तेची छान असलेल्या लातूरच्या दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत उ उत्तुंग भरारी घेत यशाची परंपरा कायम राखली असून यावर्षी NEET परीक्षेत 840 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात तब्बल 752 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत महाविद्यालयातून येण्याचा मान निखिल प्रवीण कुमार नावंदर याने पटकवला असून त्याने नीट परीक्षेत 652 गुण घेऊन महाविद्यालयात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे त्यांनी EWS प्रवरगातAIR -४४६ मिळवला आहे तर महाविद्यालयातून दुसऱ्या क्रमांकावर यश राजेंद्र बिराजदार यांनी 620 गुण घेऊन महाविद्यालयात दुसऱ्या क्रमांकावर एस संपादन केले आहे त्याने EWS प्रवर्गात AIR १६३१ मिळवलेला असून महाविद्यालयातून सागर सावंत शशिकांत याने तिसरा क्रमांक पटकावला असून त्यास 606 गुण मिळाले आहेत हा निकाल पाहता महाविद्यालयातील 40 ते 45 विद्यार्थी एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित समजला जातो या दयानंद महाविद्यालयातील घवघवीत यशामुळे लातूरच्या शैक्षणिक गुणवत्तेची पंढरी असलेल्या दयानंद शिक्षण संस्थेचा शैक्षणिक उपक्रमात कायम गुणवत्तेत दबदबा राहिलेला आहे.

दयानंद महाविद्यालयातील नीट परीक्षेत 840 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यात 752 विद्यार्थी मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत महाविद्यालयातून नेट परीक्षेत प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या व सर्व नीट परीक्षेत मेडिकल प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, शालेय शिक्षण समितीचे तथा संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, उपाध्यक्ष ललित भाई शहा, उपाध्यक्ष रमेश राठी, सचिव रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन कोषाध्यक्ष संजय बोरा, डॉ. चेतन सारडा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयप्रकाश दरगड उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद माने, पर्यवेक्षक प्रा. उमाकांत झुंजारे, पर्यवेक्षक हेमंत वरुडकर, नीट समन्वयक प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी, प्रा. बीएम सूर्यवंशी, नितेश दूधभाते, महेंद्र कोराळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे कौतुक केले आहे व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author