वैष्णव पॅराडाईज हॉटेलमुळे लातूरच्या वैभवात भर पडणार – आ. अमित देशमुख
वैष्णव पॅराडाईज हॉटेलचे भूमिपूजन
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी दुपारी लातूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक विष्णुदास मंगल कार्यालय परिसरातील धायगुडे कुटुंबियांच्या नियोजित वैष्णव पॅराडाईज हॉटेलचे भूमिपूजन करण्यात आले. नियोजित हॉटेल वैष्णव पॅराडाईज ही वास्तू दोन एकर जागेमध्ये साकारली जाणार आहे त्या वास्तूत फंक्शन हॉल एसी कॉन्फरन्स हॉल डायनिंग हॉल आदी सुवीधा देण्यात येणार असून त्यामुळे लातूरच्या वैभवात भर पडणार आहे.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सुळ, दिशा प्रतिष्ठनचे मार्गदर्शक अभिजीत देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे सरचिटणीस चंद्रकांत धायगुडे, लातूर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस विष्णुदास धायगुडे, सूर्यकांत धायगुडे, सिद्धेश्वर धायगुडे, रमाकांत गडदे, महेश धायगुडे, एकनाथ पाटील, संतोष देशमुख, समद पटेल, इमरान सय्यद, सिकंदर पटेल, सुभाष घोडके, केशव धायगुडे, माजी नगरसेविका सपना किसवे, कैलास कांबळे, प्रवीण कांबळे, रमेश सूर्यवंशी, अकबर माडजे, पवन सोलंकर, गोरोबा लोखंडे, प्रा.विजयकुमार धायगुडे, पंडित कावळे, अहमदखा पठाण, रविशंकर जाधव, व्यंकटेश पुरी, सचिन बंडापले, विकास कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, आनंद वैरागे, दगडूसाहेब पडीले, दगडूआपा मिटकरी, फैजलखान कायमखानी, विजयकुमार धुमाळ आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते धायगुडे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.
यावेळी आमदार अमित देशमुख म्हणाले की, लातूरचा नामांकीत व सुसंस्कृत असा धायगुडे परिवार आहे. या परिवाराने लातूरची सेवा केली लातूर, नगर परिषदेत ही धायगुडे परिवाराने प्रतिनिधित्व केले आहे. देशमुख व धायगुडे परिवाराचे पिढ्यानपिढ्याचे संबंध आहेत. लातूरचा चौफेर विकास होऊन प्रगती झाली असून लातूर आज ओळखू येत नाही. लातूर जिल्ह्याचा आपल्या नेतृत्वाने पारदर्शकपणे विकास केला, यामूळे आज लातूर शहरात १०० पेक्षा अधिक मंगल कार्यालय आहेत, ते सर्व चांगले चालू आहेत. या उपक्रमात आधुनिकता स्वीकारली, धायगुडे कुटुंबाने या प्रकल्पाचे लवकरात उद्घाटन करून त्यांनी हा प्रकल्प लातूरकरांच्या सेवेत रुजू करावा, असे सांगून त्यांनी धायगुडे कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण धायगुडे यांनी केले तर आभार डॉ. कुमारी साधना विजयकुमार धायगुडे यांनी मानले.