उदगीर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगारावर धाड, पोलीस कर्मचाऱ्यासह 14 आरोपींवर कारवाई

उदगीर येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगारावर धाड, पोलीस कर्मचाऱ्यासह 14 आरोपींवर कारवाई

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये धाब्याच्या पाठीमागील बाजूस सुरू असलेल्या तिरट नावाच्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास पथकाने धाड टाकली आहे.या धाडीत रोख रकमेसह अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या जुगारात सहभागी असलेल्या 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या आरोपी मध्ये देवनी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
उदगीर ग्रामीण पोलीसांकडून हाती आलेली माहिती अशी की, नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर रित्या तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिस तपास पथकास मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने धाड टाकून कठोर कारवाई केली.

या धाडीमध्ये रोख रक्कम एक लाख 82 हजार 340 रुपये व 921 हजारांच्या किमतीचे मोबाईल, वाहन व जूगाराचे साहित्य असा एकूण 11लाख 340 रुपयाचा येवज जप्त केला आहे. याप्रकरणी राम बनसोडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी दिली आहे. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरून लपून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला व खेळवला जात आहे. अशी चर्चा चालू आहे. मात्र गुन्हेगाराचे कर्दनकाळ म्हणून निकेतन कदम हे अधिकारी ठीक ठिकाणी धाडी टाकत आहेत.
संपूर्ण जिल्ह्यातून अवैध धंद्यांना मूठ माती द्यावी, अशा हेतूने लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेशित केले आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी हे जुगाराचे प्रकार चालूच आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी तर पोलीस कर्मचारी अशा जुगार अड्ड्यांना पाठिंबा देऊन वेळप्रसंगी स्वतः हजर राहून जुगार खेळून अवैध धंद्याला उत्तेजन देत असल्याची ही चर्चा राजरोस चालू आहे.

About The Author