कार्यकर्त्यांच्या पाठीसी संपुर्ण ताकत उभी करू अहमदपूरच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचे आश्वासन

कार्यकर्त्यांच्या पाठीसी संपुर्ण ताकत उभी करू अहमदपूरच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांचे आश्वासन

अहमदपूर (गोविंद काळे) : येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ताकतीने निवडणूका लढवून जिंकल्या पाहीजेत आमची सगळी ताकत तुमच्या पाठीशी उभी करू. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना. डॉ. भागवत कराड यांनी केले आहे. अहमदपूर व चाकुर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांचा मेळावा अहमदपूर शहरातील सानवी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना केंद्रीय मंत्री कराड म्हणाले की केंद्रात व राज्यात आपलं सरकार आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अहमदपुर व चाकुर तालुक्यासह लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कमी पडणार नाही असी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी यावेळी दिली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार रमेशआप्पा कराड हे होते. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर शृंगारे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी सभापती अशोक काका केंद्रे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस त्र्यंबकआबा गुट्टे, भाजपा नेते राजकुमार मजगे, माजी सभापती अँड. भारत चामे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य परमेश्वर घोगरे, माजी सभापती आर.डी.शेळके, प्रशांत पाटील, अशोक दादा चिंते, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी , माजी उपसभापती सज्जन कुमार लोणाळे, माजी सभापती रोहीदास वाघमारे,निळकंठ पाटील, कमलाकर पाटील, रामभाऊ बेल्लाळे, सुधीर गोरटे, अमित रेड्डी, राजू खंदाडे, ज्ञानोबा बडगिरे, चंद्रशेखर डांगे , विक्रम काका शिंदे, राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, किशोर कोरे, भाजपाचे बालाजी पाटील चाकूरकर, चाकूर तालुकाध्यक्ष शिवाजी बैनगिरे, अहमदपूर तालुका अध्यक्ष हनुमंत देवकते, डॉ. सिद्धार्थकुमार सुर्यवंशी, रामभाऊ नरवटे,महेश बिलापटे, शिवानंद भोसले , बालाजी पडोळे, प्रताप पाटील, दत्तात्रेय जमालपूरे, देविदास सुरनर, नाथराव केंद्रे, जिल्हा अल्यसंख्याक अध्यक्ष बबलूभाई पठाण, बालासाहेब गुट्टे, बालाजी मुंडे, सौ. भाग्यश्रीताई क्षिरसागर, सौ. गयाबाई शिरसाट, प्रणिता बेबळगे, जयश्री केंद्रे हे उपस्थित होते .या मेळाव्यास अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख ,कार्यकर्ते बुथ प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदपुर शहरात केंद्रीय अर्थमंत्री महोदयांचे यांचे आगमन होताच येथे सावरकर चौकात जेसीबी च्या सहाय्याने फार मोठा पुष्पहार घालून भव्य स्वागत संयोजक माजी मंत्री विनायकराव पाटील व अशोक काका केंद्रे यांच्या वतीने करण्यात आले.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!