बुद्धी प्रदान करणारी देवता म्हणजे श्री गणपती बाप्पा.श्री ह भ प भागवताचार्य, दिलीप महाराज मुसळे मोळवणकर

बुद्धी प्रदान करणारी देवता म्हणजे श्री गणपती बाप्पा.श्री ह भ प भागवताचार्य, दिलीप महाराज मुसळे मोळवणकर

अहमदपुर (गोविंद काळे) : येथील साई गणेश मिल्ट्री फाऊंडेशन रुध्दापाटी येथील आयोजीत गणेशोत्सव विसर्जन काल्याचे किर्तनात श्री ह भ प भागवताचार्य,दिलीप महाराज मुसळे मोळवणकर हे बोलत होते जो भक्त गणपती बाप्पांची मनोभावे या उत्सवात सेवा करतो त्या भक्तांना गणपती बाप्पा नक्कीच सुबुद्धी प्रदान करतात, गणपती बाप्पा हि देवता अशी आहे की भक्तांना सुख प्रदान करणारी व दुःखाचे हरण करणारी देवता आहे, सध्याच्या चालु असलेल्या उत्सवाच्या काळात जे काही देवाच्या पुढे कार्यक्रम आयोजित केले जातात याच्यावर महाराजांनी शोकांतिका व्यक्त केली, मनुष्याने देवाला जे आवडतं ते करावे आपल्याला जे आवडत ते करु नये मात्र आपण देवाला आवडते ते करत नसून आपल्याला आवडतं ते करतो, म्हणुनच आपली भक्ती फलद्रूप ठरत नाही, मात्रं आपल्या साई गणेश मिल्ट्री फाऊंडेशन चा गणपती किर्तन ऐकत असतो असेही महाराज बोलताना म्हटले, सदरील किर्तन सोहळ्याचे व महाप्रसादाचे आयोजन मा. श्री. अशोककाका केंद्रे जि, प, सदस्य, सौ. अयोध्याताई अशोकराव केंद्रे व अनिरुद्ध केंद्रे यांनी केले होत, या कार्यक्रमास परिसरातील भक्तगण व मिल्ट्री फाऊंडेशनचे सर्व शिक्षक व जवान बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!