सुखमणि वृद्धाश्रमातील वृद्धांची श्री क्षेत्र पंढरपूर येथे सहल
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात गत 7 वर्षांपूर्वी सुखमणि वृद्धाश्रमाची स्थापना झाली असून वृद्धाश्रमातील वृद्धांचे दुःखद आयुष्य विसरून त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा सुखमणि वृद्धाश्रम समिती नेहमीच प्रयत्नशील असते. वृद्धाश्रमातील वृद्धांना हवापालट व आध्यात्मिक वातावरणात रमवण्याच्या दृष्टीने श्री. क्षेत्र पंढरपूर येथे सहल काढण्यात आली होती. सर्व वृद्धांना आपल्या भोळ्या भाबड्या विठ्ठलाला पाहून अंतःकरण भरून आले. खूप वृद्धांनी तर आता वयस्कपणामुळे पांडुरंगाचे पंढरीत जाउन दर्शन घेण्याची आशा सोडून दिली होती, परंतु वृद्धाश्रम समितीने त्यांचे विठ्ठल दर्शन आनंदात पार पाडले. सहलीचे सुव्यवस्थितरीत्या नियोजन पार पाडण्यासाठी आशिष यंगाले, मंगेश कदम, सचिन टिकोरे, दीपक हलसे, अनुप सोळंके,नितीन सोळंके, सुदर्शन बडगिरे, अनुसया पांचाळ, रमेश पांचाळ आदींनी परिश्रम घेतले.
