महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गौरव समारंभ संपन्न

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गौरव समारंभ संपन्न

उदगीर (एल.पी.उगिले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास नॅक ए प्लस मानांकन मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने प्राचार्य, नॅक समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर व कार्यालयीन कर्मचारी, यांचा पुष्पगुच्छ व गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी होते. मंचावर उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, सदस्य प्रा. मनोहर पटवारी, सुभाष धनुरे ,बसवराज पाटील मलकापूरकर, ललिता पाटील, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ. बी. एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के ,उपप्राचार्य सी.एम.भद्रे ,पर्यवेक्षक जे.आर. कांदे, नॅक समन्वयक प्रा.डॉ.के.आर.गव्हाणे यांची उपस्थिती होती.

यावेळी चाकूरकर म्हणाले की, महाविद्यालयाला मिळालेले मानांकन सर्वांच्या कामाचा एकत्रित परिणाम आहे, संस्था सदैव आपल्या पाठीशी असून गुणवत्ता वाढ करून नवनवीन अभ्यासक्रम सुरू व्हावेत. डॉ. लखोटिया म्हणाले चांगल्या नियोजनामुळे मानांकन मिळाले, मिळालेले यश स्थिर ठेवण्यासाठी आणखी काम वाढविले पाहिजे. डॉ. रेड्डी म्हणाल्या की, मानांकनामुळे जबाबदारी वाढली असून बदलत्या काळाप्रमाणे आपणही योग्य ते बदल आत्मसात केले पाहिजेत.
प्रा.पटवारी म्हणाले, बदलत्या काळाप्रमाणे गुणवत्ता वाढवून कौशल्य अभ्यासक्रम चालू करावे लागतील. तिरुके म्हणाले सूक्ष्म नियोजन व सामूहिक प्रयत्नामुळे मानांकन प्राप्त झाले. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले सर्वांच्या जिद्द ,मेहनत व तळमळीमुळे मानांकन प्राप्त झाले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संस्था सदैव खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. प्रास्ताविक डॉ. बी.एम संदीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मल्लेश झुंगास्वामी यांनी केले, तर आभार प्रा.डॉ.आर.के.मस्के यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!