अहमदपूरच्या गणेश विसर्जनात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धरला ठेका
अहमदपूर (गोविंद काळे) : शहराच्या गणेश विसर्जनात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचे पद प्रतिष्ठा बाजूला सारून गणेश भक्तासोबत बँडचा ठेका धरून गणरायाला निरोप दिला. मुस्लिम बांधवांनी गणरायाच्या मुर्त्यावर व गणेश भक्तावर फुलांची उधळण करून राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडवून आणले. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गरजेने अहमदपूरचे रस्ते दुमदुमून गेले.
नगरपरिषद अहमदपूर च्या वतीने मुख्य रस्त्यावर स्वागत कक्ष उभारण्यात आला होता या स्वागत कक्षामध्ये उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक प्रवीण फुलारी, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, डीवायएसपी सुधीरजी खेरडकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, पोलीस निरीक्षक चिदंबरम कामठेवाड, पोलीस निरीक्षक संतोष जाधवर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक तुलसीदास रोकडे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अंधोरीकर, कार्यालयीन अधीक्षक सतीश बिलापटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अहमदपूरच्या मुख्य रस्त्यावरून मानाच्या गणपतीचे आगमन होताच लोकांची प्रचंड अलोट गर्दी दिसून आली श्री बाल गणेश सार्वजनिक मंडळ (आजोबा गणपती) या गणेश मंडळ, लोकमान्य सार्वजनिक गणेश मंडळ (पंजोबा गणपती) राजस्थानी सार्वजनिक गणेश मंडळ, मराठवाडा सार्वजनिक गणेश मंडळ भोई गल्ली, अण्णाभाऊ साठे सार्वजनिक गणेश मंडळ श्रीकृष्ण बाल गणेश मंडळ भाग्यनगर, जागृती गणेश मंडळ गुणाले गल्ली या सर्व गणेश मंडळाच्या भव्य मूर्तीचे नगर परिषदेच्या वतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार घालून अभिवादन केले, मुस्लिम बांधवांनी गणरायाच्या मूर्ती बरोबर गणेश भक्तावर फुलांची उधळण करत अहमदपूरातील राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडवून आणले, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गणेश भक्त सोबत चांगलाच ठेका धरला उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, व डी वाय एस पी सुधीर खेरडकर यांनी बँडच्या तालावर नृत्य करत सर्वच पोलीस बांधवांनी ठेका धरायला सुरुवात केली हे दृश्य पाहून सर्वांनाच आनंद झाला. गणेश विसर्जनात कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. या सर्व गणेश मंडळाचे सूत्रसंचालन व समालोचन प्रख्यात निवेदक प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी केले.
पोलीस प्रशासनाने गणेश भक्तांना दंडुक्याचा धाक न दाखवता प्रेमानेच समजावून सांगत विसर्जन पार पाडले. नगरपरिषदेच्या वतीने शेख मुसा, सय्यद पाशा दिलीप ससाने शेख महंमद चंद्रकांत नागरगोजे, गौतम वाघमंबर, विशाल ससाने या सर्व नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गणेश विसर्जना मिरवणुकीसाठी सहकार्य केले.
