आमची मुलगी या वेबसाईटवर तक्रार आणि परराज्यात जावून यशस्वी सापळा
पी सी पी एन डी टी ॲक्ट 1994 व सुधारित 2003 नुसार नागरिकांच्या तक्रारींसाठी व गुप्त माहितीसाठी शासनाकडून आमची मुलगी ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.या वेबसाईटवरच अज्ञात व्यक्तींकडून संबंधित डॉक्टरच्या कृत्य संदर्भात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे उमरगा तालुक्याच्या सीमा वरती भागातील व कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्हा आहे. उमरगा तालुक्यातील व शेजारील काही व्यक्ती एजंटच्या सहाय्याने कलबुर्गी येथे जाऊन गर्भलिंग निदान चाचणी करून येतात अशी नागरिकात चर्चा होती याच्यावर पाळत ठेवून माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विक्रम आळंगेकर व इसीजी तंत्रज्ञ पद्माकर घोगे यांनी संबंधित डॉक्टरवर कलबुर्गी येथे जाऊन पाळत ठेवली होती. कार्यवाहीसाठी परराज्य असल्यामुळे सामुचित प्राधिकारी (local authority) ही जबाबदारी कलबुर्गी येथील आरोग्य विभागाची असल्याने अडचणी येत होत्या. जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील, पीसीपीएनडीटी कोऑर्डिनेटर डॉक्टर दत्तात्रय खुणे, विधी सल्लागार रेणुका शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विक्रम आळंगेकर यांनी टीम तयार करून स्वतः डॉक्टर आळंगेकर, इसीजी तंत्रज्ञ पद्माकर घोगे, परिसे विका सु नंदा गोस्वामी, आधि परिचारिका गोकर्णा पांचाळ, कनिष्ठ लिपिक उत्तमबाइ शिदोरे व उस्मानाबाद जिल्ह्याच्या विधी सल्लागार एडवोकेट रेणुका शेटे या टीमने दोन दिवस कलबुर्गी येथे तळ ठोकून नियोजनबद्ध पाठपुरावा करून सापळा रचत डॉक्टर गुरुराज कुलकर्णी यांचे पितळ उघडे केले आहे.
कलबुर्गी स्थित डॉक्टर गुरुराज कुलकर्णी कुलकर्णी हा खाजगी एजंट मार्फत रुग्ण शोधून पंधरा हजार रुपये घ्यायचा व वेळोवेळी सोनोग्राफी करण्यासाठी जागा बदलून पत्ते सांगायचा संबंधित डॉक्टरवर टीमने पाळत ठेवून दिनांक 14सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता सोनोग्राफी करत असताना व गर्भलिंग निदान करत असताना एका जुन्या घरात धाड टाकली असता तपासणीत पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, प्रोब, कनेक्टेड वायर सोनोग्राफी जेल आदी साहित्य आढळून आले .हे सर्व साहित्य महसूल विभाग पोलीस विभाग व आरोग्य आरोग्य विभाग यांच्या समक्ष सील करून संबंधितावर दिनांक14/09/2022रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्त्रीभ्रूण हत्येविरोधात सरकारने कठोर कायदा केल्यानंतरही काही सोनोग्राफी चालकाकडून बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान केले जात असल्याचे उघड झाले आहे. चोरी लक्षात येऊ नये म्हणून नानाविध क्लृप्त्या घडवल्या जात असून आपणास माहिती असल्यास आपली मुलगी या वेबसाईटवर इतक्रार करावी असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विक्रम आळंगेकर यांनी केले आहे.