प्रोत्साहनच माणसाला यशाकडे घेऊन जाते – प्रा.डॉ. रामकृष्ण बदने
परभणी (प्रतिनिधी) : मानवी जीवनात प्रोत्साहनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.लहान वयात मुलाला बोलायला, चालायला प्रोत्साहन देण्याचे काम सर्वप्रथम आई करत असते. मला तर असे वाटते की सर्वप्रथम आपण आपलालाच प्रोत्साहन द्यायला शिकले पाहिजे. ईश्वराने आपणास पाठवताना प्रत्येकाच्या हाताच्या अंगठ्याचे ठसे अलग अलग देऊन पाठवले आहे. याचा अर्थ आपण आपल्या कार्यकर्तुत्वाचा वेगळा ठसा उमटवावा असी त्याची इच्छा आहे.ही इच्छा तेंव्हाच पूर्ण करता येईल जेंव्हा आपण आपणास आतून प्रोत्साहन देऊ. ईश्वराने आपणास या पृथ्वीवर पाठवत असताना सर्वगुण देऊन न पाठवता काही महत्त्वाचे गुण देऊन पाठवले आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाचा गुण आपल्याकडे कुठला आहे?तो आपण शोधून त्याच्यात अंतरंग मिसळून कार्य करायला शिकले पाहिजे. असेच कार्य लतादीदी,सचिन तेंडुलकर, शिवाजीराव भोसले व अन्य यशस्वी माणसांनी केलेले आपणास दिसून येतात.भगवद्गीतेमध्ये स्वतःच्या प्रोत्सानाबद्दल म्हटले आहे ‘उद्धरावा स्वय आत्मा’ महात्मा गौतम बुद्ध म्हणतात ‘अत दिप भव’ किंवा ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ असे ही आपल्याकडे म्हटले जाते. त्यानंतर आपणास प्रोत्साहन देण्याचे काम आपले आई-वडील करतात. मलाही जीवनात इथपर्यंत येण्यासाठी आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले होते. आई इतकेच प्रोत्साहन देण्यात पत्नीचे ही खूप महत्त्वाचे योगदान असते.ते ही विसरून चालत नाही. त्यानंतर आपणास विद्यालयातून गुरुजी (गुरु) व देवालयातून संत प्रोत्साहन देण्याचे काम करतात.एवढेच नाही तर ग्रंथ देखील निस्वार्थपणे आपणास जीवन जगताना वेळोवेळी प्रोत्साहन देतात. पण प्रोत्साहनातून चांगले काम करण्यासाठीचे आपण स्वीकारले पाहिजे.प्रोत्साहनच माणसाला यशाकडे घेऊन जाते असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. रामकृष्ण बदने यांनी लायन्स क्लब परभणी प्रिन्स पदग्रहण समारंभात ‘प्रोत्साहनम’या कार्यक्रमांतर्गत सरदेशपांडे नर्सरी परभणी येथे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष विजय दराडे हे होते.तर पदग्रहण अधिकारी म्हणून माजी प्रांतपाल एम.जे.एफ. ला.राजेशजी राऊत, शपथविधी अधिकारी रिजन चेअर पर्सन ला. सुनील बीयाणी आणि प्रमुख उपस्थितीत झोन चेअरपर्सन ला.अड. दर्शन कळमकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी नूतन कार्यकारणी अध्यक्ष म्हणून ला.सचिन सरदेशपांडे, सचिव म्हणून ला.मनोहर चौधरी, कोषाध्यक्ष म्हणून ला. संकेत अग्रवाल व अन्य पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. यावेळी ला.राजेशजी राउत,ला. सुनीलजी बियाणी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रबद्ध सूत्रसंचलन ला. प्राचार्यडॉ. विठ्ठल घुले यांनी केले तर आभार ला.अड.दर्शन कळमकर यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ला. डॉ. प्रवीण धाडवे यांनी केले. कार्यक्रमास ला.वसंतराव धाडवे, ला. झुंबरलाल मुथा, ला. प्रदीप गोलेच्या, लॉ. डॉक्टर संजय जोगड, ला. एडवोकेट राजकुमार भामरे,लॉ. संतोष नरवाणी, ला.प्रा.नरहरी फड, ला. रितेश जैन, ला. अड सुभाष इंगळे, लॉ. बासाटवर, लॉ. उल्हास न्हावेकर, ला. गोविंद शर्मा, ला. सुनील मुथा, ला अवीकुमार टाक, ला.चंचल निकम, लॉ पूजा कळमकर,ला. श्रद्धा रितेश जैन, सौ.सागर फड, सौ.दैवशाला रामकृष्ण बदने, ला . प्रिया ठाकूर मॅडम, लॉ. वैशाली सरदेशपांडे व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.