नांदेड गुरूनगरीला जगात सर्वोच्च स्थान – हरपाल कौर मान
नांदेड (गोविंद काळे) : श्री गुरु गोबिंदसिंघ जी यांच्या आलौकिक जीवनातील अंतिम क्षना शी संबंधित नांदेड हे पवित्र स्थान सिख पंथाचे पाँचवे तखत साहिबान मधील एक शिरोमणी तखत आहे, ज्याची प्रसिद्धि भारत देशात च नाही तर जगात असून नांदेडच्या या गुरूनगरीला जगात सर्वोच्च स्थान असल्याचे श्रीमती हरपाल कौर यांनी म्हटले आहे. पंजाब चे मुख्यमंत्री सरदार भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांचे काल गुरुद्वारा दर्शनासाठी गंगानगर एक्सप्रेस ने नांदेड येथे आगमन झाले, त्यांचे नानक साई फाऊंडेशन च्या वतीने जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे आणि त्यांच्या टीमने स्वागत केले. सरदार भगवंत मान पंजाब च्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या नंतर हरपाल कौर दुसऱ्यांदा नांदेड दौऱ्यावर आल्या आहेत. चार दिवसाच्या नांदेड दौऱ्यात त्या सचखंड गुरुद्वारा, लंगर साहिब गुरुद्वारा सह जवळपास च्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन माथा टेकणार आहेत. गुरू गोबिंद सिंघ जी महाराज यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या नांदेड नगरी आल्यानंतर जीवनाच सार्थक झाल्यासारखे वाटते, नांदेड आमच्या करिता सर्वोच्च स्थान असल्याचे हरपाल कौर म्हणाल्या. दरम्यान सचखंड गुरुद्वारा कमिटी तसेच गुरुद्वारा लंगर साहिब च्या वतीने हरपाल कौर मान व त्यांच्या सहकाऱ्यांच आदरतिथ्य करण्यात आले, याबद्दल त्यानी धन्यवाद व्यक्त केले. लंगर साहिब गुरुद्वारा चे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्याची आई असुन हि साधी राहणी,उच्च विचारसरणी चा प्रत्यय हरपाल कौर मान यांची भेट झाल्यानंतर येतो. पंजाब सारख सरकार देशात सर्वच ठिकाणी अस्तित्वात आलं पाहिजे असं त्या म्हणाल्या.