सेलू येथील विनायक भोसले यांनी नीट परीक्षेत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मिळवलेले यश कौतुकास्पद-डॉ. संतोष मुंडे
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : तालुक्यातील सेलू येथील विनायक भोसले यांनी नीट परिक्षेत यश संपादन केले त्याबद्दल सत्कार राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.दरम्यान अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही याचा प्रत्यय विनायकने समाजासमोर ठेवला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत परिस्थिती मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे डॉ.संतोष मुंडे यांनी सांगितले. विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता. परळी. याच्या वडिलांचे सन-2014 मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकाची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुनी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अंबाजोगाईत धुणे-भांडी करण्याचे काम सुरू केले. व एकाच छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चारजनांचे कुटुंब राहते.याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात.विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशी चा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. मात्र अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. विनायक ची आई सुनीताबाई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आजही लोकांची भांडी घासतात.आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली.नीट च्या शिकवणीची फिस भरू शकत नसल्याने त्याने यूट्यूब वर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाहून मेहनतीने अभ्यास केला.व नीट च्या परीक्षेत 595 गुण प्राप्त केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल शनिवार, दि.10 सप्टेंबर रोजी परळीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते विनायक भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.परळी सारख्या ग्रामीण भागातून अथक परिश्रमाच्या बळावर विद्यार्थी घवघवीत यश संपादन करत आहेत. परळी शहरातही अनेक शैक्षणीक संस्था विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहेत.परळी शहर व परिसरातुन घडत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उज्वल यशासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करु असेही डॉ. संतोष मुंडे यांनी यावेळी सांगितले. सत्कार प्रसंगी माजी सरपंच पद्माकर शिंदे, वचिष्ठ मुसळे, एकनाथ शिंदे, अशोक देशमुख व इतर उपस्थित होते.