वाढवणा पाटी येथील दारू दुकानाला राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे साथ म्हणूनच पेठ्यांच्या पेठ्या पार्सल व किरकोळ दारू चढया भावाने विक्री करून ग्राहकांची आर्थिक लुट

वाढवणा पाटी येथील दारू दुकानाला राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्याचे साथ म्हणूनच पेठ्यांच्या पेठ्या पार्सल व किरकोळ दारू चढया भावाने विक्री करून ग्राहकांची आर्थिक लुट

हुकूमत शेख (वाढवणा बु. ) : वाढवणा पासुन अवघ्या तिनकिलोमीटर मीटर अंतरावर असलेल्या वाढवणा पाटी येथील देशी दारू दुकान परवाना धारक आहे का नाही कळायला मार्ग नाही असेल तर मग पाटी वर परवाना धारकांचे नाव, लायसन्स क्रमांक, दुकान चालु बंद करण्याची वेळ लायसन्स थ्री आहे का टू कळायला मार्ग नाही मात्र या दुकानातून सर्रास अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना पेठ्यांच्या पेठ्या होलसेल पार्सल मोटार सायकल वर जाताना दिसतात दुकानात 180 मी ली. ची भिंगरी बाटली वर किंमत 70 रुपये आहे मात्र ग्राहकास 75 रुपये ला विक्री केली जाते या दुकानाला वेळ चे बंधन दिसत नाही केव्हा पण चालु होते पहाटे पासुन रात्री बारा वाजे पर्यंत चालुच राहते बारा नंतर देखील झोपलेला वाचमन हाक मारल्या मारल्या झोपेतून उठून देखील पेठ्या व किरकोळ बाटली विक्री करतो तळीराम म्हणतात ही दुकान बंद होतच नाही मागेल तेव्हा दारू व पेठ्या मिळतात पहाटे रात्री अवैध धंदे करणाऱ्यांना देखील येथे घरपोच करण्यासाठी सप्लायर ठेवलेले आहे एवढी हिम्मत दुकान दाराला आली कुठून तर एकच जमेची बाजू म्हणजे संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची साथ व मिली भगत असल्यामुळेच हा दुकानदार बिनधास्त चढ्या भावाने व पेठ्या होलसेल व टाइम टेबल नाहीच केव्हा पण चालुच अवघ्या 16किलोमीटर अंतरावर उदगीर येथे राज्यउत्पादन शुल्क कार्यालय असुन देखील संबंधित अधिकारी दुकानाला भेट देत नाहीत दिले तरी खिसा गरम करून घेउन जात असल्यामुळेच सरकार मान्य दुकान असुन देखील कायद्याचे पालन होताना दिसत नाही किमती प्रमाणे बाटली विकली जात नाही चढया भावाने विकली जाते किरकोळ विक्री करण्याचे अधिकार असताना पेट्याच्या पेट्या विक्री केली जाते या बाबीची चौकशी वरिष्ठ राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी करून दुकानदारावर कायदेशीर कार्यवाही करण्याची चर्चा पिणाऱ्या ग्राहकाकडून होत आहे.

About The Author